🌟परभणी तालुक्यातील पेडगावात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला यांच्या तर्फे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न....!


🌟यावेळी महाबीज जिल्हा व्यवस्थापक आर.आर राठोड कृषि अधिकारी खांदेभराड यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

परभणी : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या.अकोला यांच्या तर्फे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन पेडगाव येथील मंगेश प्रतापराव देशमुख यांच्या शेतात हरभरा BDN-GK 798 (सेमी डॉलर) या वाणाचे करण्यात आले.

 यावेळी महाबीज जिल्हा व्यवस्थापक आर.आर राठोड कृषि अधिकारी श्री. खांदेभराड,श्री.धांडे,अंकुश गायकवाड व परिसरातील महाबीज बीज उत्पादक शेतकरी श्री विठ्ठलराव दे .पंडितराव दे. प्रमोद दे. अशोक जंगले. संतोष सुरवसे . संजय ठोंबरे. अजय दे राजेश दे शंतनु दे चेतन दे. मनोज दे  रामेश्वर दे संदीप दे विशाल दे गुणाजी आव्हाड आदी उपस्थित होते.

 त्या वेळी राठोड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व क्षेत्र पाहणी केली तसेच या कार्यक्रमाचे आयोजन माझ्या शेतावर केल्याबद्दल मी महाबीज चा सर्व अधिकारी व शेतकरी बांधवांचे आभार व्यक्त करतो असेही राठोड म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या