🌟परभणी जिल्ह्यातील खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा सवलत गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.....!


🌟असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केले आहे🌟

परभणी (दि.29 फेब्रुवारी) :  सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयता दहावी आणि बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू  विद्यार्थ्यांना क्रिडा सवलतीचे गुण मिळविण्यसाठी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव नेहमिच्या प्रचलित पद्धतीनूसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केले आहे.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता दहावी परिक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्याच्या बाबतीत इ. सहावी पासुन दहावी पर्यंत केव्हाही क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य मिळविले असल्यास क्रीडा सवलत गुण देण्यात येतील तथापी त्या विद्यार्थ्याने इयत्ता दहावी मध्ये क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक राहील व सहभागाचा पुरावा म्हणून ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रत मुख्याध्यापक स्वाक्षरीनिशी जोडणे आवश्यक राहील. 

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता बारावी मध्ये प्रविष्ट खेळाडु विद्यार्थ्याच्या बाबतीत सहावी पासुन बारावी पर्यंत केव्हाही क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. परंतु सदर खेळाडुस दहावी मध्ये प्रमाणपत्रावर क्रीडा सवलत गुण घेतले असल्यास यावर्षी तो क्रीडा सवलत गुण घेण्यास पात्र असणार नाही. तथापी या खेळाडुने अकरावी आणि बारावी मध्ये प्राविण्य/ सहभाग घेतला असेल तर तो क्रीडा सवलत गुण देण्यास पात्र राहील. 

भारतीय शालेय खेळ महासंघ व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. खेळाडू कोणत्याही जिल्ह्यातुन खेळला तरी, खेळाडु विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकत असेल त्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे शिफारशीसह प्रस्ताव सादर करावा. क्रीडा संचालनालयाने मान्यता दिलेल्या खेळ प्रकारातील एकविध खेळ संघटनानी आयोजित केलेल्या राज्यस्तर तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभाग व प्राविण्य खेळाडुच क्रीडा सवलत गुणास प्रात्र राहतील.

तथापी एकविध खेळ संघटनानी शासन निर्णयानुसार सन 2023-24 या वर्षातील आवश्यक सर्व कागदपत्रे व स्पर्धा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावीत जेणे करुन विद्यार्थ्याचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर करता येतील, कागदपत्रे प्राप्त न झाल्यास सदर खेळाडुचे प्रस्ताव शिफारस करता येणार नाहीत त्यामुळे खेळाडु विद्यार्थ्याच्या होणाऱ्या या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. इयत्ता दहावी, बारावी मध्ये शिकत असलेल्या खेळाडु विद्यार्थ्याने एकापेक्षा जास्त स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असेल तर सदर खेळाडुचे सर्वोच्य कामगीरी असलेल्या एकाच पात्र खेळाचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडावे. 

प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी ही संबंधीत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयची राहील. शाळा/कर्मचारी/ शिक्षक यांचे मार्फत प्रस्ताव सादर करावेत. पालकासोबत प्रस्ताव पाठवु नये. संबंधीत प्रस्तावात त्रुटीमुळे विद्यार्थ्यास क्रीडा सवलत गुण न मिळाल्यास संबंधीत शाळा/क.महाविद्यालय जबाबदार राहील. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रस्ताव दि. 25 मार्च 2024 पर्यंत सादर करावते तसेच अधिक माहितीसाठी प्रकाश पंडित (मो.नं.8788525374) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या