🌟नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डावर सरकारने लादलेल्या नवीन कायद्या विरोधात साखळी उपोषणाचा आज १२ वा दिवस...!


🌟जिल्हा प्रशासन निद्रिस्त ? उपोषणार्थीं आंदोलकांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष🌟

नांदेड (दि.२० फेब्रुवारी) - राज्य शासनाने गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 संमत करून लादला जात असल्याने त्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाची मागील अकरा दिवसापासून जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. 


    जागतिक ख्यात कीर्तीचे सचखंड गुरुद्वारा नांदेडच्या व्यवस्थापनासाठी अस्तित्वात असलेला गुरुद्वारा बोर्ड अॅक्ट 1956 बदलून राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 संमत केला आहे या कायद्याला सर्व शीख धर्मीयांचा देशभरातून विरोध होत आहे याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज बारवा दिवस असून आज चक्री उपोषणचा आज बारवा  दिवस असून आजचे उपोषण करता स. पुरणसिंग राम सिंग स. गुरमीत सिंग बेदी स. किरपाल सिंघ हजुरिया स.मनिंदर सिंग राज रामगडिया स.भोला सिंग गाडीवाले स.शेर सिंग पुजारी स.केहर सिंग खालसा स. जसबीर सिंग बुगंई स. रवींद्र सिंग पुजारी स. सिमरंजीतसिंग कुंजीवाले स. रोशन सिंघ चिरकूट वाले.यानी सहभाग घेतला तर उपोषणार्थींना शेर सिंघ फौजी स. गुरमीत सिंग महाजन स. मनप्रीत सिंग कुंजीवाले स.रविन्दर सिंघ बुंगई   जगदीप सिंघ नम्बरदार स.मनबीर सिंघ ग्रंथी स.जरनैलसिंघ गाडीवाले स. दीपक सिंघ गल्लीवाले स.राजेंद्र सिंग पुजारी दीपक सिंह हजुरिया स. करण सिंघ लोनिवाले अमरप्रीत सिंघ हंडी हरभजन सिंघ पुजारी  दीपक सिंघ हजूरिया बीरेंद्र सिंघ बेदी  महेन्दर सिंघ पैदल सुरेंद्र सिंग मेंबर  जसपाल सिंग लांगरी अवतार सिंग पहरेदार  स. ग्रुरप्रीत सिंग सोखी स. मंनप्रीत सिंग कारागीर स. सुखविंदर सिंग हुदल. स. इंदर सिंग शाहू स. बिल्लू सिंग रंगी गुरुदीप सिंघ संधू हरजीत सिंग गिल स. अमरजीत सिंग कुंजीवाले  स. जगजीत सिंग खालसा स. प्रेमजीत सिंग शिलेदार यांनी जाहिर पाठिंबा दिला.


साखळी उपोषणाचा आज बारवा दिवसाचा कालावधी लोटला असला तरीही जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेऊन कारवाई करण्याचे टाळले आहे. या साखळी उपोषणाला आम आदमी पार्टी चे पदाधिकारी एड.जगजीवन भेदे स. नरेंद्र सिंग ग्रंथी डॉ.अवधूत जागीदार व विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून यामध्ये जिल्ह्याचे दिग्गज लोकप्रतिनिधी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या