🌟स्वयंम् शिक्षण प्रयोग संस्थेमार्फत रिसोड तालुक्यामध्ये कलापथकातून जनजागृती.....!


🌟या कार्यक्रमाला जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला🌟

फुलचंद भगत

वाशिम - जी.आय.झेड.डब्ल्यू.एच.एच.,एकात्मिक बाल विकास सेवा आणि स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेमार्फत पोषणम अभियानांतर्गत लोककलेतून कलापथकाद्वारे सामाजिक जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रमातून मागील महिनाभरात जनजागृती करण्याचे काम तालुका रिसोड तालुक्यात करण्यात आले. माहे जानेवारी- फेब्रुवारीमध्ये रिसोड तालुक्यातील ५ गावांमध्ये म्हणजेच भर जहागीर, कवठा, गोवर्धन, महागाव आणि कळमगव्हाण येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली.

 ज्यामध्ये विविध जनजागृती गाण्याच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून आणि पथनाट्याच्या माध्यमातून गावामध्ये लोकांच्या रोजच्या आहारात किमान ५-६आहार समूहाचा वापर, कुपोषण व त्याचे प्रकार आणि कुपोषण चक्र कसे तोडावे, स्तनपान, वैयक्तिक स्वछता, परसबाग लागवड, सामाजिक व्यवहार, सकारात्मक दृष्टिकोन याबरोबरच लहान बालके व १५ ते ४९ वयोगटातील किशोरी, गर्भवती, स्तनदा, प्रजननक्षम महिलांच्या आरोग्य व आहारात पौष्टिक आहारामध्ये विविधतेविषयी जनजागृती पुरुषोत्तम बाबा कला संचाच्या साह्याने करण्यात आली. या कार्यक्रमाला जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रिसोड तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका अमिता गिर्‍हे, नीता मांजरे आणि मीना गवांदे यांच्यासह रिसोड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सरपंच आणि गावकर्‍यांचे चांगल्या प्रकारे सहकार्य देखील मिळाले आहे. त्याचबरोबर एस. एस. पी. संस्थेच्या मुख्य प्रशिक्षिक शेख शबनम यांच्या मार्गदर्शनातून सौ. पायल गोविंद शर्मा, श्रीरामचंद्र रोडगे, सौ. प्रीती सरनाईक, सौ. उषा बदर आणि सौ. शुभांगी इंगोले या पोषणमित्रांनी आपल्या भागांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या