🌟नांदेड जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार तथा सा.दैनिक नांदेडवार्ता मुख्य संपादक ॲड.प्रदिप नागापूरकर यांना मातृशोक....!


🌟मातोश्री प्रेमिलाबाई अनंतराव नागापूरकर यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी दुःखद निधन🌟

नांदेड : नांदेड शहरातील विनायकनगरातील मराठा हॉटेल जवळील ज्येष्ठ नागरिक  प्रेमिलाबाई अनंतराव नागापूरकर यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दापकाळाने काल गुरुवार दि.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ०१-३० वाजेच्या नंतर दुःखद निधन झाले.

 त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ०४-०० वाजता गोदावरी नदीपात्रारील गोवर्धनघाट येथील शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात रत्नाकर अनंतराव नागापूरकर,संजय अनंतराव नागापूरकर व सा. दैनिक नांदेडवार्ता मुख्य संपादक तथा कामगार नेते अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदीप नागापूरकर अशी तिन मुल व कृपा जोशी (नागापुरकर) एक मुलगी असून यांच्या पश्चात तिन मुल एक मुलगी,जावई, नातवंडे,असा मोठा परिवार आहे प्रख्यात कामगार नेते ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत अनंतराव नागापूरकर  यांच्या त्या सहचरणी होत्या. दिवंगत अनंतराव नागपूरकर यांच्या संघर्षमय जीवनाला त्यांनी खंबीर साथ दिली.

मातोश्री प्रेमिलाबाई अनंतराव नागापूरकर यांना जंग-ए-अजित न्युज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या