🌟महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन.....!

🌟यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 


परभणी : महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात  आयोजन करण्यात आले असून यामध्ये सकाळी आठ वाजता क्रीडा प्रकाराचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले.


यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून,निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, जीवराज डापकर आणि  जिल्ह्यातील सर्व तहसीलदार,  नायब तहसीलदार अधिकारी कर्मचारी, संघटनांचे विविध प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. 

आजच्या स्पर्धांमध्ये शिवाजी महाविद्यालय आणि जिल्हा क्रीडा संकुल येथे धावणे, पोहणे, कॅरम, बुद्धिबळ, थ्रो बॉल, बॅडमिंटन, लॉंग टेनिस, टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो रिंग, गोळा फेक, थाळीफेक इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच सायंकाळी बी रघुनाथ हॉल येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या