🌟मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची उद्या २० फेब्रुवारी रोजी जयंती.....!


🌟अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद उद्याच म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी बाळशास्त्रीं जांभेकर यांची जयंती साजरी करीत आहे🌟

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म तारखेवरून विनाकारण वाद घातला जातोय .. तो निरर्थक यासाठी आहे की, राज्य सरकारने तीन वर्षांपुर्वी एक जीआर काढून 20 फेब्रुवारी 1812 रोजी रोजी बाळशास्त्रींचा जन्म झाल्याचे स्पष्ट केले आहे.. बाळशास्त्रींचा जीवनपट पाहिला तर 20 फेब्रुवारी ही सरकारनं नक्की केलेली तारीख बरोबर आहे असे वाटते..

मात्र गुगलचा हवाला देणारी काही मंडळी बाळशास्त्रींचा जन्म 6 जानेवारी  रोजी झाला असे मानते.. ते साफ चूक आहे..  6 जानेवारी रोजी बाळशास्त्रींची जन्म झाला नाही तर 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्रीं जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले.. त्यांचं स्मरण म्हणून आपण 6 जानेवारी रोजी दर्पण दिन किंवा पत्रकार दिन साजरा करतो.. जन्म तारखेबाबत गुगलने दिलेली माहिती खरी नाही.. 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद उद्याच म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी बाळशास्त्रीं जांभेकर यांची जयंती साजरी करीत आहे.. इतर सर्व पत्रकारांनी उद्याच जयंती साजरी करावी अशी विनंती आहे.. जयंतीवरून वाद किंवा संभ्रम नको..17 मे 1848 रोजी बाळशास्त्रीं यांचे निधन झाले आहे..आणखी एक गुगलवर बाळशास्त्री जांभेकर यांचे वेगवेगळे चार पाच फोटो दिलेले आहेत.. चित्रकार मुकुंद बहुलेकर यांनी काढलेले सोबतचे चित्र पाहून "हेच खरे बाळशास्त्री"  अशी मान्यता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या चित्राचं अनावरण करताना दिली होती.. बाळशास्त्रींची विद्वत्ता, शरीरयष्टी पाहता हे चित्र योग्य वाटते.. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद गेली 25 वर्षे हेच चित्र वापरते आपण सर्वांनी तेच चित्र वापरावे असे परिषदेचे आवाहन आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या