🌟सेलू येथील श्री.केशवराज बाबासाहेब विद्यालयात आयोजित स्नेहसंमेलनात बोलतांना ते म्हणाले🌟
सेलू (दि.०१ फेब्रुवारी) - सध्याच्या जगात अतिशय वेगाने बदल आणि विकास होत आहे.नवनवे तंत्रज्ञान येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शाळांचे आणि शिक्षणाचे बदलते स्वरूप आत्मसात करून आपल्या जीवनाची प्रगती साधावी.तसेच आयुष्यात सगळ्यात आवश्यक म्हणजे मित्र असतात.चांगले मित्र जोडून एकमेकांचे आयुष्य समृद्ध बनवा.तसेच शिक्षकांचा सन्मान करायला हवा असे प्रतिपादन पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथील विद्यापीठ विभाग प्रमुख सेवानिवृत्त प्राध्यापक तथा श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ संतोष मोरेगावकर यांनी केले.
येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात आज दि 01 फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध जोशी,प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेशराव खारकर,संचालक जयंतराव दिग्रसकर,रामेश्वर राठी,मुख्याध्यापक पी एस कौसडीकर,बी यु हळणे आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ संतोष मोरेगावकर यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी काही पुस्तके देखील भेट म्हणून दिले संस्थेचे सचिव महेशराव खारकर म्हणाले की,शैक्षणिक विकासासोबत शारीरिक,मानसिक,सांस्कृतिक विकास हा वार्षिक स्नेहसंमेलनात घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमधून होत असतो.विद्यार्थ्यांनी देखील विविध स्पर्धांमधून सहभाग घेऊन आपले भविष्य घडवावे प्रास्ताविकात बी.यु.हळणे यांनी शाळेच्या वर्षभराचा अहवाल सादर केला.
या कार्यक्रमात इयत्ता 5 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यशस्वी झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.सकाळसत्रात झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी होते.तर प्रमुख वक्ते म्हणून बालकवी भगवानराव कुलकर्णी होते.तसेच संस्थेचे संचालक प्रवीण माणकेश्वर,सुरेशराव रोडगे,विष्णुपंत शेरे,तसेच ऍड अशोकराव फोफसे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली कुरुडे यांनी केले,पाहुण्यांचा परिचय शुभांगी भाग्यवंत यांनी दिला तर आभार सर्जेराव सोळंके यांनी मानले.
अध्यक्षीय समारोपात ऍड.अनिरुद्ध जोशी म्हणाले की,श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातून अनेक दर्जेदार विद्यार्थी घडले आहेत.याचे श्रेय शिक्षकांना आहे.शाळेने शिक्षण क्षेत्रात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.शिक्षणाचा दर्जा उत्तरोत्तर वाढत जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी तर आभार दिलीप बेदरकर यांनी केले.....
0 टिप्पण्या