🌟परभणी जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागांतर्गत अनाथांसाठी शासन सुविधा पंधरवडाचे आयोजन....!


🌟असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे🌟

परभणी (दि.23 फेब्रुवारी) : जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागांतर्गत अनाथ बालकांसाठी दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च, 2024 या कालावधीत अनाथ पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनाथ बालकांसाठी या कालावधीमध्ये महसूल विभागाच्या समन्वयाने आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड इत्यादी लाभ मिळवून देण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कल्याण नगर, शिवराम नगर येथे समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व अनाथ बालकांनी याचा लाभ घेण्यासाठी दि. 23 फेब्रुवारी ते 05 मार्च 2024 या कालावधीत समर्पित कक्षातील गजानन पटवे (मो.नं.7875251575), आनंता सोगे (मो.नं. 8411876770) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या