🌟जय हिंद सेवाभावी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रा.राजकुमार मनवर यांना 'महाराष्ट्र गौरव' पुरस्काराने सन्मानित..!


🌟माजी मंत्री तथा माजी खासदार ऍड.गणेशराव दुधागावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान 🌟

परभणी (दि.12 फेब्रुवारी) - शिक्षण क्षेत्रातील 25 वर्षापासूनच्या भरीव योगदानाबद्दल प्रा.राजकुमार मनवर यांना पुरस्कार देण्यात आला. वसमत रोड कल्याण नगर येथील आय एम ए हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय असलेल्या या पुरस्कारासाठी राज्यभरातील अनेक जिल्ह्यातून पुरस्कारासाठी गुणवंताना या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते.

शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असलेले प्रा. राजकुमार मनवर यांना माजी मंत्री तथा माजी खासदार ऍड. गणेशराव दुधागावकर यांच्या हस्ते पुरस्कार बहाल केला. यावेळी जयहिंद चे सत्तार इनामदार,उपमाहापौर भगवान वाघमारे, विशाल बुधवंत, गफार मास्टर, शाईर इम्रान, अभिनेत्री वैशाली, आणि ऍड. निलेश पुरी मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाला कला, सांस्कृती,नाट्य, संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर हजर होते प्रा.मनवर यांचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.......

💐महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.राजकुमार मनवर यांचे शतशः हार्दिक अभिनंदन - संघपाल अडागळे संपादक हर्ष नगरी 

'स्वरा म्युझिकल ग्रुपचे डायरेक्टर' पत्रकार,अभ्यासू, सिटी चॅनल परभणी टीव्ही चे पहिले 'जयभीम' वाले निवेदक आणि मुलाखतकार, अनुकंपाधारक लढ्यातील दमदार नेतृत्व, आंबेडकरी चळवळीतील इमानदार कार्यकर्ता, आंबेडकरी जलसा प्रबोधनकार  गायक, परिवर्तनवादी चळवळीतील व्याख्याते, सांस्कृतिक कला मंच चे जिल्हा प्रमुख मार्गदर्शक, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रमाधिकारी, कोरोना काळातील संगीतमय जनजागृती योद्धा, कवी, गीतकार, समाजसेवक, बौद्ध धम्म चळवळीतील विविध कार्यक्रमाचे आयोजक-नियोजक  आ. प्रा. राजकुमार मनवर सर यांना या वर्षीचा जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्थेचा राज्य पातळीवरील शैक्षणिक उत्कृष्ट कार्याबद्दल 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार' मिळाल्याबद्दल त्यांचे हर्ष नगरीचे संपादक संघपाल अडागळे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या