🌟नांदेड शहर युवक काँग्रेस तालुका महासचिव पदावर किशोर जगदीश शर्मा यांची नियुक्ती....!


🌟राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांचा हस्ते नियुक्तीपत्र प्रदान🌟 

नांदेड (दि.११ फेब्रुवारी) - नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठीत व्यापारी किशोर जगदीश शर्मा यांची नांदेड शहर युवक काँग्रेस पक्षाच्या तालुका महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांना तालुका महासचिव पदाचे नियुक्तीपत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांच्या प्रदान करण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते किशोर जगदीश शर्मा यांची नांदेड शहर युवक काँग्रेस पक्षाच्या तालुका महासचिव पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते भवाणीसिंह गुहीलोत मित्र मंडळाच्या वतीने अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या