🌟शहरातील आनंद नगरातील लोककल्याण बॅंकेजवळ सायं.७-०० वाजता कारसेवक व रामभक्तांना गौरव सोहळ्याचे आयोजन🌟
पुर्णा (दि.०३ फेब्रुवारी) - कारसेवको के बलिदान से मंदीर हुवा निर्माण चलो करते हैं इस शुभ अवसरपर उन कारसेवको का भव्य सन्मान' सन १५२८ साली तब्बल जवळपास पाच शतकांपूर्वी मुघल आक्रमनकारी बाबर याने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील श्रीराम रामजन्मभूमी मंदिर उध्वस्त करीत त्या ठिकाणी स्वतःच्या नावाने बाबरी मशिदेचे निर्माण करण्याचे पाप केले होते या जागेवर ताबा मिळवून श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण करण्यासाठी हिंदुना न्यायालयीन लढाईसह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करावा लागला सन १९९० साली अयोध्येत झालेल्या आंदोलनात तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या अत्याचारी निर्देशावरुन असंख्य कारसेवकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले यावेळी परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातील देखील अनेक कारसेवक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले होते या कारसेवक व रामभक्तांमुळेच दि.२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत झालेल्या भव्य श्रीराम जन्मभुमी मंदिरातील श्रीरामचंद्र मुर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा तमाम हिंदुना पाहण्याचा ऐतिहासिक क्षण प्राप्त झाला अश्या कारसेवकांसह रामभक्तांचा यथोचित गौरव करण्याच्या निर्मळ उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील आनंद नगर परिसरातील लोककल्याण बॅंकेजवळ रविवार दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ०७-०० वाजेच्या सुमारास आयोध्या येतील राम मंदिर निर्माणसाठी बलिदान व योगदान देणाऱ्या कारसेवका बरोबरच पुर्णा शहरात भूतो न भविष्य अशी शोभायात्रा व दरवर्षी रामनवमी साजरी करणाऱ्या श्रीराम भक्तांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित या कारसेवक व रामभक्त गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुर्णा तालुका व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष डॉ.जयप्रकाश मोदाणी हे तर स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के हे राहणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित या भव्य सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी,मनसे जिल्हा उपाध्यक्ष यादव माहत्मे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असून या भव्य सन्मान सोहळ्यास मनसेचे पुर्णा तालुका अध्यक्ष अनिल बुचाले,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, गंगाखेड तालुका अध्यक्ष राहुल डोंगरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे तरी पुर्णा शहरासह तालुक्यातील तमाम हिंदू समाज बांधवांनी व कारसेवक रामभक्तांनांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या भव्य सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजक तथा मनसेचे पुर्णा शहराध्यक्ष राज उर्फ गोविंद ठाकर यांनी केले आहे.......
🌟जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तथाकथित हिंदुत्ववादी संघटना तसेच पक्षांचं नेतृत्व करणाऱ्यांना पडला रामभक्त कारसेवकांचा विसर ?
तथाकथित हिंदुत्ववादाचा ढोल/ताशा बडवून स्वतःच्या संधीसाधू राजकीय स्वार्थाची भुक भागविणाऱ्या राजकीय बकासुरांना रामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या कारसेवक रामभक्तांचा कायम विसर पडला असतांना प्रथमतः प्रखर राष्ट्रभक्त कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना नगरसेवक तथा विधीज्ञ ॲड राजेश भालेराव यांनी अयोध्येतील ऐतिहासिक प्रभु श्रीरामचंद्रांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला दि.२१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास शहरातील कारसेवक रामभक्तांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन ढोल/ताश्यांच्या गजरात 'न भुतो ना भविष्यती असा' सपत्नीक सत्कार केला त्यामुळे हिंदू धर्मियांच्या स्वाभिमानासाठी लढा देणारे खरे चेहरे तरुण पिढीला खऱ्या अर्थाने समजलें यानंतर देखील शहरासह तालुक्यातील तथाकथित संधीसाधू हिंदुत्ववाद्यांना यत्किंचितही लाज वाटली नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष तथा प्रखर हिंदुत्ववादी रामभक्त राज उर्फ गोविंद ठाकर यांनी रविवार दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं.०७-०० वाजता कारसेवकांसह श्रीराम भक्तांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केल्याने तथाकथित हिंदुत्ववादी बाजारबसव्यांचे चेहरे पुन्हा एकदा उघड झाल्याचे निदर्शनास येत आहे......
0 टिप्पण्या