🌟वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे मतदार जनजागृती रॅली संपन्न.....!


🌟यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस.यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 


✍🏻फुलचंद भगत

वाशिम :- मंगरुळपीर तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदार जनजागृती सप्ताहानिमित्त स्थानिक जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे,सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अपूर्वा बासुर, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी शितल बंडगर, तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे, सेवानिवृत्त सैनिक, दिव्यांग व्यक्ती, शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत रॅली ला संबोधित करून तहसील कार्यालयापर्यंत स्वतः पायदळ चालून  रॅली चे नेतृत्व केले. 

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या कृष्णा ढोले व इतर विद्यार्थ्यानी सादर केलेल्या मतदार जनजागृती गीताने रंगत आणली.त्याच ठिकाणी मतदार राजा जागा हो.. हे पथनाट्य इशानी राऊत व संच यांनी उपस्थित मान्यवरांच्या समोर सादर केले.तद्नंतर शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानवी साखळी,रांगोळी स्पर्धेचे, आदर्श मतदान केंद्रांचे निरीक्षण झाल्यावर, सेल्फी पाँइंट पाहणी करून मंचावर आगमन झाले. उपस्थित मान्यवरांचा स्वागत समारंभ पार पडल्यानंतर जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी कु.तन्वीआठवले,विद्या बोबडे,अंश राऊत,सत्यम गावंडे,रोशन चेके, साहील पडघान यांच्या समवेत आम्ही मतदान करणारच... .. हे पथनाट्य बहारदारपणे सादर केले.यावेळी ईव्हीएम व्हीव्ही पॅट मशिन विषयी प्रिती मेहकरकर यांनी माहिती दिली. वसंतराव नाईक महाविद्यालय व जिल्हा परिषद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान करणे बंधनकारक असावे की नसावे या विषयावर आयोजित वादविवाद स्पर्धेत आपआपली मते यशस्वीपणे मांडली.यामध्ये भारत गव्हाणे, वजीर खान, वेदांत राठोड, करण शेजव, पूजा सोनोने, मोनिका पवार, समृध्दी मिटकरी, प्रिया गावंडे,पायल जाधव, कृष्णा ठाकरे,पियुष शिंदे,अमित भगत व ईश्वरी जावळे यांनी आपली मते प्रभावीपणे मांडली. निष्कर्ष म्हणून उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, निवासी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आपली मते परखडपणे व्यक्त केली. प्रसंगी रांगोळी स्पर्धेतील, वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.उत्कृष्ट कार्याबद्दल दिपक राऊत, तायडे, राठोड आदी शिक्षकांना गौरविण्यात आले.रॅली मधील सहभागी श्रावणी हिंगासपुरे, राध्येशाम जाधव, सुभेदार राजू लाटेकर, नामदेव चव्हाण, मेजर जामनिक, एन.सी.सी.पथक,पायदळ पथक,सायकल रॅली,बाईक रॅली मधील सर्वांचे गुलाबपुष्प देवून आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक राऊत व प्रिती मेहकरकर यांनी केले.हा मतदार जनजागृती सप्ताह यशस्वी होण्यासाठी निवडणूक नायब तहसिलदार बोंडे, घनश्याम तवले, मिलिंद भगत , हटकर व तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी तसेच जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या