🌟महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी आमदारकीसह पक्षाचाही दिला राजीनामा...!



🌟दिग्गज काँग्रेस नेते अशोकराव चव्हाणांनी काँग्रेसला ठोकला अखेरचा राम राम : भाजपात प्रवेशाची शक्यता ?🌟

भारतीय स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात मोठा राजकीय सत्ताधारी पक्ष म्हणून नावारूपाला आलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सात/आठ दशकातच उतरती कळा लागली असून मागील दिड/दोन दशकांपासून सातत्याने सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षातून अनेक दिग्गज पिढीजात काँग्रेसी नेते बाहेर पडून भारतीय जनता पक्षाचे कमळ आपल्या हातात घेऊन आपआपले राजकीय वर्चस्व अबाधित अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.


भारताचे माजी गृहमंत्री स्व.शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देखील कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यपदासह आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचा देखील राजीनामा आज सोमवार दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकर यांच्याकडे पाठवल्याने पक्षांतर्गत खळबळ माजली असून या संदर्भात यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अनधिकृत माहिती देण्यात आलेली नाही विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचा रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी गेलो भेटलो होतो असे अशोकराव चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आल असल तरी आगामी राज्यसभा निवडणूकीच्या तोंडावर अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षात प्रवेश करु शकतात असं बोललं जात असून भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते असे झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकी नंतर अशोकराव चव्हाण हे केंद्रात केंद्रीय मंत्री म्हणून देखील शपथ घेण्याची शक्यता नाकारता येत नाही तर दुसरीकडे मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आज मोठा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होणार असल्या संदर्भात बॅनर देखील लावण्यात आल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाला एकप्रकारे दुजोराच मिळाल्याचे दिसत असून अशोकराव चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थकांनी देखील राजीनामे देण्यास सुरुवात केली असल्याने राज्यात राजकीय भुकंपाची शक्यता वर्तवली जात आहे......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या