🌟छत्रपती संभाजी नगर येथे संबोधी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण संपन्न....!


🌟यावेळी संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छ.संभाजी नगरच्या वतीने विशेष जाहीर सत्कार कार्यक्रम ही करण्यात आला🌟


संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर, आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक समाजभूषण मा.भीमराव हत्तीअंबीरे यांच्या मार्गदर्शनाखाली  दि.10 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यसेवा परीक्षा पूर्व  प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निरोप समारंभ व यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.


यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रशिक्षणार्थ्यांनी वेगवेगळे कला प्रकार सादर करून आपला आनंदोत्सव साजरा केला या कार्यक्रमाला ज्यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला असे मा.नितीनजी बगाटे साहेब ( भा.पो.से. उपायुक्त, परिमंडळ- 1 , छत्रपती संभाजीनगर) यांची उपस्थिती होती प्रमुख अतिथि म्हणुन मा.सुनिलजी लांजेवार (अतिरिक्त पोलीस अधिक्षक, छत्रपती संभाजीनगर,ग्रामीण) तथा मा.शिरीषजी बनसोडे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना) यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.रविंद्रजी जोगदंड ( उपमुख्य कार्यकारी अधिकारी,स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजीनगर) यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात फुले, शाहू आबेडकरांच्या प्रतिमा पूजनाने झाली यानंतर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे समाजभूषण मा.भीमराव हत्तीअंबीरे यांनी शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले याच स्वागत सोहळ्यात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लाखो लोकांचे प्राण वाचवणार्‍या मा.नितीनजी बगाटे साहेबांचा समाजभूषण मा.भीमराव हत्तीअंबीरे यांच्या हस्ते तथा संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर च्या वतीने विशेष जाहीर सत्कार करण्यात आला.


 यानंतर समाजभूषण मा.भीमराव हत्तीअंबीरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यामागील खडतर प्रवास आणि संस्थेची ध्येयभूत उद्दिष्टे सांगितली. बाबासाहेबांचा दृष्टिकोण समोर ठेऊन मी माझ्या परीने शक्य होईल तेवढे समाजभान जपन्याचा मी प्रयत्न करीत आहे. संघर्षाचा वारसा जपून कोणत्याही संकटाला न घाबरता आपण निडर होऊन यश प्राप्त करायला हव.या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण कालावधी दरम्यान जी ज्ञानार्जनाची शिदोरी या एका वर्षात आपण प्राप्त केली आहे त्याद्वारे यश खेचून आणण्यासाठी प्रयत्शील रहा. जिथे असाल तिथे आनंदी राहून सुखदुःखात साद देत चला,आई बाबांच स्वप्न पूर्ण करा, उद्दिष्टाबद्दल प्रामाणिक राहा आणि संघर्ष करून प्रकाशमय जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आपण बहुसंख्येने शासकीय सेवेत जावे तोच खरा आनंदाचा परतावा आमच्यासाठी ठरेल असे ते म्हणाले यासोबतच यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले .

यानंतर मा.नितीनजी बगाटे साहेब( भा.पो.से. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-1,छत्रपती संभाजीनगर ) यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी *संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आलेल्या  जाहीर सत्काराचे त्यांनी सहृदयतेने आभार मानले. छत्रपती संभाजीनगर येथे काही दिवसांपूर्वी उद्भवलेल्या भयंकर आपत्तीला यशस्वीरीत्या नियंत्रित करून लाखो लोकांचे प्राण मी व माझ्या सोबत असलेल्या सहकार्यांनी वाचवले, लोक या भयंकर घटनेला विसरूनही गेले परंतु काही लोकांची मने ही पारिजातकाची असतात, आणि म्हणुनच आपण केलेला सत्कार हा माझा शहरातील पाहिलाच सत्कार आहे. यामुळे मी आपणा सर्वांचा खूप आभारी आहे असे ते म्हणाले यासोबतच  संवाद साधताना त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरित केले. अंधारातून प्रकाशाकडे चला ध्येय प्राप्त करून कुटुंबाची मान उंचावने यापेक्षा मोठी उपाधि कोणती हे सांगताना त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना कठोर मेहनत करून यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

यानंतर मा.शिरीषजी बनसोडे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जालना) यांनी मार्गदर्शन केले. आयुष्यात संयमाला खूप महत्त्व आहे. यासाठी स्पर्धेत टिकून राहण्याकरीता चौफेर विचार करा. मार्गदर्शन करणार्‍यांच मोटिव्हेशन हे आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारे असावेत. ध्येय ठरवुन ते प्राप्त करने हे आणि आईबापांच्या आनंदाचे साक्षीदार होने यासारखी दूसरी मोठी गोष्ट नाही. बाबासाहेब आंबेडकर हे सेल्फ मोटिव्हेशन मुळे प्रकांड पंडित,  विश्वनायक होऊ शकले,  यासाठी स्वतःतील सुप्त शक्तीचा शोध घेऊन स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करा. असे सांगून त्यांनी BARTI च्या नावाआधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संबोधन वापरण्याचे आवाहन केले.यानंतर मा.सुनीलजी लांजेवार ( अतिरिक्त पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ) यांनी मनोगत मांडले. स्वतः शी प्रामाणिक रहा घरच्यांना फसवू नका, स्पर्धेतील बदलांना सामोरे जा, यश प्राप्त होई पर्यंत थांबू नका स्वतः ची रननीति आखून वाटचाल करा ध्येय प्राप्त झाल्यावर हुरळून न जाता आपली पावले जमिनीवरच ठेवा असे सांगून त्यांनी अभ्यासाविषयी सखोल मार्गदर्शन केले. 

  यानंतर अध्यक्षीय समारोप मा.रविंद्रजी जोगदंड (उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजीनगर ) यांनी केला. *रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग....या तुकोबा रायाच्या अभंगाच्या ओळी सांगून कठोर मेहनत करण्याची प्रेरणा दिली. स्वप्ने असे बघा जे झोप येऊ देणार नाही. अभ्यास करताना एकाग्रतेचे महत्व त्यांनी विषद केले यानंतर  शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा काकफळे यांनी केले तर आभार धीरज पोहेकर यांनी मानले याप्रसंगी विचार मंचावर संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या महाव्यवस्थापक प्रा.भाग्यश्री सातदिवे यांची उपस्थिती होती.

          कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक प्रा . ज्ञानेश्वर हरकळ, प्रा.कैलास फूलउंबरकर प्रा.साईनाथ बोराळकर, प्रा.कल्याण पाटील, प्रा.विठ्ठल पुंगळे, प्रा.अनिल नाईक ,प्रा.संजय बिडवे, ,प्रा.राजाराम जेवे, प्रा. देवीदास इंगळे, प्रा.जितेंद्र तरटे, प्रा.अमोल तळणकर,प्रा.अतुल कुलकर्णी, प्रा.मंगेश लोंढे, व्यवस्थापक राजेश पवार,बाबासाहेब भराडे ,विशाल जल्हारे, राजेश चांदणे, आदर्श भवरे ,प्रशांत मकासरे ,अक्षय गवळी आदींनी प्रयत्न केले प्रार्थनेनंतर स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या