🌟परभणीतील निसर्ग कॉलनी खंडोबा बाजार रस्त्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या हस्तें उद्घाटन....!


🌟माता रमाई यांच्या 126 व्या जयंतीचे औचित्य साधून रस्त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न🌟


परभणी (दि.07 फेब्रुवारी) - परभणी शहरात आज बुधवार दि.07 फेब्रुवारी 2024 रोजी माता रमाई यांच्या 126 व्या जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 03 मधील निसर्ग कॉलनी खंडोबा बाजार येथील एमके पान शॉप ते मक्कलभाई यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे व इतर कामांचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे,मागासवर्गीय जिल्हाप्रमुख धम्मदीप रोडे,संजय शिंदे,विजय शिंदे,सुरेश चांदणे,गोविंद रायमले, लक्ष्मण बोबडे,सुदर्शन बनसोडे, हनुमानभाऊ रायमले,तारे बंधू,तुकाराम दुगाने,सूळ दादा,घुले,कलंदर साहब, हुसेन शेख, दामू अण्णा खुणे, प्रशांत खुणे, देशमुख साहेब,हज्जू शेख, मोबीन शेख, गणेश सूळ,भुजंग राव काळे,विठ्ठल तात्या गायकवाड, संजू पोळ, फरकांडकर या सह तेथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, मागील 25 ते 30 वर्षापासून इथे मूलभूत सुविधांचा अभाव होता, निदान आज तुमच्यामुळे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, भविष्यात अजूनही विकास कामे होतील अशा भावना येथील नागरिकांनी व्यक्त करून जिल्हाप्रमुख वेंकटराव भाऊ शिंदे व मागासवर्गीय जिल्हा प्रमुख धम्मदीपभाऊ रोडे यांचे आभार मानले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या