🌟आराध्यदैवत आणि गौरवस्थान यांची कास धरली,तरच सोनार समाजाचा सर्वांगीण विकास होईल - मिलिंदकुमार सोनार


🌟सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांचे प्रबोधन करणे ही काळाची अनिवार्य गरज🌟

नाशिक (प्रतिनिधी)- राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नरहरी महाराज हे सोनार समाजाचे आराध्य दैवत, तर नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट सोनार हे सोनार समाजाचेच गौरवस्थान नाहीत, तर आशियायी राष्ट्रांना ब्रिटिश इंडिया कंपनी सरकारच्या माध्यमातून रेल्वे द्वारे जवळ आणणारे,स्वातंत्र्यपूर्व अखंड हिंदुस्थानचे (पर्यायाने स्वतंत्र भारताचे) वादातीत विकासपुरुष तसेच आपल्या सर्व शाखीय सोनार समाजाचे गौरवस्थान आहेत. पिढ्यानुपिढ्या शाखीय अस्मितेत रमलेल्या आपल्या सर्व शाखीय सोनार समाजाचा आराध्यदैवत आणि गौरवस्थान या दोहोंची कास धरूनच सर्वांगीण विकास साधता येईल. सर्व शाखीय सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापक, समन्वयक, आणि सामंजस्य विचारदृष्टी ठेवून सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांचे प्रबोधन करणे ही काळाची अनिवार्य गरज आहे.


एकविसावे शतक हे विकासाचे आहे, जागतिकीकरणानंतर विविध राष्ट्रांना विकासदृष्ट्या एकत्रित आणणारे आहे. अशा वेळी आपल्या समाज बांधव आणि भगिनी यांनी राजकीय पक्षांचा उदो उदो करण्यापेक्षा आराध्यदैवत आणि वादातीत विकासपुरुष तसेच समाजाचे गौरवस्थान या दोहोंची महती सर्व शाखीय सोनार समाजाच्या विविध स्तरांमध्ये पोहोचविणे ही काळाची अनिवार्य गरज आहे. तेव्हा समाजधुरिणांनी हे काम आपले सामाजिक इतिकर्तव्य म्हणून बजावले पाहिजे असे आवाहनदेखील मिलिंदकुमार सोनार यांनी ऑल इंडिया सोनार फेडरेशन,सकल भारतीय सोनार समाज संघटन* आणि *सेतुबंधन* समाविष्ट असलेल्या विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे केले आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या