🌟कामरगावच्या अब्दुल फारुकने पटकावली ‘लहुश्रीजी’ विजेता ट्रॉफी....!


🌟भव्य बॉडी बिल्डींग व फिटनेस स्पर्धेला बॉडीबिल्डर्सचा उदंड प्रतिसाद🌟

🌟साहित्यरत्न अण्णाभाऊ सााठे जिल्हास्तरीय जयंती उत्सव समितीचे यशस्वी आयोजन🌟

फुलचंद भगत

वाशिम - क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मरणार्थ व वाशिम जिल्हा बॉडी बिल्डर्स अ‍ॅन्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंती उत्सव समितीच्या आयोजनातून शुक्रवार, १६ फेब्रुवारीला स्थानिक अकोला नाका येथील जैन भवनात पार पडलेल्या भव्य जिल्हास्तरीय बॉडी बिल्डींग व फिटनेस स्पर्धेत पिळदार शरीरयष्टीच्या कामरगावच्या अब्दुल फारुकने ‘लहुश्रीजी’ विजेता ट्रॉफीवर आपले नाव कोरुन ११ हजाराचे बक्षी पटकावले व जिल्ह्याचे नाव उज्वल केले.


कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य नितेश मलीक तर उद्घाटक म्हणून प्रा. दिलीप जोशी यांची उपस्थिती लाभली. तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी जि.प. अध्यक्षा सौ. सोनालीताई लांडगे जोगदंड, माजी नगरसेवक राहुल तुपसांडे, शाम दुरतकर, माजी पं.स. सदस्य विनोद जोगदंड, भाजपा लोकसभा समन्वयक राजु पाटील राजे, मनसे जिल्हाध्यक्ष राजु पाटील किडसे, बंटी सेठी, विजय लोंढे, नारायण डाखोरे, संजय वैरागडे, रंजनाताई पौळकर, शाम देवळे, आकाश कांबळे, मेजर सुनिल पवार यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रा. दिलीप जोशी यांचे स्वागत समितीचे अध्यक्ष राम बाजड यांनी तर नितेश मलीक यांचे स्वागत समिती सचिव रविकुमार कांबळे यांनी पुष्पगुच्छ देवून केले. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हयातील विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी विविध पोझ देवून आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन घडविले. या स्पर्धेत परिक्षकांनी कामरगाव येथील अब्दुल फारुक यांनी लहुश्रीजी २०२४ चा चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन घोषीत केले. तर वाशिमचे आनंद खैरे यांनी लहुश्रीजी २०२४ बेस्ट पोझरचा खिताब पटकावला. लहुश्रीजी २०२४ बेस्ट मस्कुलर ट्रॉफीवर कामरगावचे सय्यद मोईझुद्दीन यांनी आपले नाव कोरले. ० ते ६० च्या प्रथम वजनी गटाच्या पहिल्या गटात प्रथम सोहेलखान वाशीम, व्दितीय प्रविण बुंधे मंगरुळनाथ, तृतीय सुनिल घोले वाशिम, चतुर्थ विशाल मयघने मंगरुळनाथ तर पंचम बक्षीस शेख अल्ताफ मालेगाव यांनी पटकावले. ६० ते ६५ च्या दुसर्‍या वजनी गटात प्रथम शरद रोकडे वाशिम, तृतीय इम्रानखान कामरगाव, तृतीय विकास जाधव वाशिम तर शेख अरबाज रिसोड या स्पर्धकाला चतुर्थ विजेता घोषित करण्यात आले. ६५ ते ७० च्या तिसर्‍या वजनी गटात प्रथम सय्यद मोईनोद्दीन कामरगाव, व्दितीय शेख आरिफ रिसोड, तृतीय मोहम्मद फैजान वाशिम, चतुर्थ शिवम कठाळकर वाशिम तर पंचम बक्षीस गोपाल विखे रिसोड यांनी पटकावले. ७० ते ७५ च्या चौथ्या वजनी गटात प्रथम अब्दुल फारुक, व्दितीय इरफानखान कामरगाव, तृतीय सय्यद अनवर रिसोड, चतुर्थ शेख अबरार कामरगाव, पाचव्या खुल्या गटात प्रथम वाशिमचे आनंद खैरे तर मंगरुळनाथचे सुमित मेटकर यांनी दुसरे बक्षीस पटकावले.

पंचकमेटी म्हणून वाशिम जिल्हा बॉडी बिल्डर्स अ‍ॅन्ड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष गणेश बाबरे, कोषाध्यक्ष दिलीप मुंदे, सचिव नितीन गावंडे विदर्भ जज तर सदस्य दरेकार, अंकुश सारसकर, विजय जाधव, अनिल थडकर, रवि रोकडे, मिलींद डोंगरे यांनी काम पाहीले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती सचिव रविकुमार कांबळे, सुत्रसंचालन दिपक भालेराव यांनी केले. स्पर्धा पाहण्यासाठी जिल्हाभरातील रसिक बहूसंख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राम बाजड, उपाध्यक्ष कैलास थोरात, सचिव रविकुमार कांबळे, कोषाध्यक्ष गजानन वैरागडे, सहकोषाध्यक्ष मोहनराज दुतोंडे, सदस्य शंकर खंडारे, बबलु गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या