🌟पुर्णेत सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने 'महाराष्ट्राची लोकधारा' या लोकनृत्य व लोककलेचे आयोजन....!


फोटो : दिलीप खंडेराय

🌟तालुक्यातील जनतेला सहकुटुंब हा कार्यक्रम पहाता यावा यासाठी महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे🌟

🌟 शहरातील जुना मोंढ्यात शनिवार दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ०६-०० वाजता कार्यक्रमाचे आयोजन🌟 

पुर्णा (दि.१७ फेब्रुवारी) - पुर्णा येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शनिवार दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ०६-०० वाजता शहरातील जूना मोंढा मैदानावर "महाराष्ट्राची लोकधारा" या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

           श्री खंडेराय कला मंडलम् छत्रपती संभाजी महाराज नगर , प्रस्तुत व प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नृत्य कलावंत दिलीप खंडेराय दिग्दर्शित "महाराष्ट्राची लोकधारा" या पांरपारीक मराठ मोळा लोकनृत्य व लोककलेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी जूना मोंढा मैदानावर भव्य रंगमंच उभारण्यात आला आहे. तालुक्यातील जनतेला सहकुटुंब हा कार्यक्रम पहाता यावा यासाठी महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मराठमोळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या