🌟परभणी जिल्ह्यातल्या थेट कर्ज योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार यांनी केले🌟

परभणी (दि.20 फेब्रुवारी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालयास सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता रुपये एक लक्ष केवळ प्रकल्प मर्यादा असलेल्या थेट कर्ज योजने अंतर्गत मुख्यालयामार्फत एकुण 50 चे उदिष्ट प्राप्त झालेले आहे. उपरोक्त उदिष्ट पूर्ण करण्याकरिता कर्ज मागणी अर्ज दि. 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज स्विकारण्यात आलेले आहेत. 

या योजने अंतर्गत एकुण 128 कर्ज प्रकरणे प्राप्त झालेले असुन त्यापैकी 112 पात्र व 16 अपात्र असुन पात्र अर्जदार 112 असुन त्यापैकी पुरुष 70 व महिला 42 पात्र अर्जदार आहेत. सदरील पात्र अर्जा मधुन उदिष्टाच्या 50 टक्के पुरुष व महिला 50 टक्के या प्रमाणे पुरुष 25 व महिला 25 शासन निर्णयाप्रमाणे (लॉटरी पध्दतीने) लाभार्थी निवड करणे आवश्यक असून ज्या अर्जदारानी थेट कर्ज योजने अंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालया मध्ये सादर केलेत आणि पात्र आहेत अशा अर्जदारानी मंगळवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृह, जायकवाडी वसाहत, परभणी  उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या