🌟नांदेड जिल्ह्यातील भोकर शहरात राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती उत्साहात साजरी...!


🌟राष्ट्रसंत सेवालाल महाराज जयंती महोत्सवास मा.मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण याची प्रामुख्याने उपस्थिती🌟


 
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भोकर शहरात काल रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या महोत्सवाचे आयोजन ॲड.विनोद चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांच्या प्रामुख्याने उपस्थिती होती.


बंजारा समाजाचे सन्माननीय दिक्षा गुरु प्रेमसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंती महोत्सवास माजी आमदार अमिताई चव्हाण माजी आमदार अमरभाऊ राजुरकर बंजारा समाजाचे नेते देविदास राठोड,रोहिदास जाधव,ॲड.रामराम नाईक यांची देखील उपस्थिती होती यावेळी भोकर तालुक्यातील तालुक्यातील नाय कारभारी सरपंच सरपंच विविध संघटनेचे पदाधिकारी सर्वपक्षीय राजकीय पुढारी यांच्या उपस्थितीत जयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या जयंती सोहळ्यास पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बंजारा समाज बांधवांनी विशेष सहकार्य केले या सर्वांचे ॲड.विनोद चव्हाण यांनी विशेष आभार मानले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या