🌟ओबीसी आरक्षण अस्तित्वाची लढाई आणि जाणीव विजयाच्या दिशेने.....!


🌟ओबीसी आरक्षण अस्तित्वाची लढाईसाठी आमरण उपोषणाला महाराष्ट्रातील सर्व शाखीय सोनार समाजाचा पाठिंबा🌟

नाशिक (प्रतिनिधी) - नाशिक येथे काही दिवसांपूर्वी ओबीसी प्रवर्गात समावेश असलेल्या सर्व जाती समूहांना मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानानजीक सोनार समाजाचे लढवय्ये कार्यकर्ते आणि समाजाचे ढाण्या वाघ असलेल्या श्री गजुभाऊ घोडके यांना ओबीसी आरक्षण अस्तित्वाची लढाईसाठी आमरण उपोषणाला महाराष्ट्रातील सर्व शाखीय सोनार समाजाचा पाठिंबा आणि समर्थन सकल भारतीय सोनार समाज संघटनेने सेतु बंधन चे माध्यमातून प्राप्त करून दिले.

या ओबीसी आरक्षण अस्तित्वाच्या लढाईचा सकारात्मक परिणाम होऊन ओबीसी प्रवर्गातील सर्व जातींमध्ये नवचैतन्य आले. हिंगोली येथील ओबीसी एल्गार सभे त प्रथमच ओबीसी नेते यांनी राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नरहरी महाराज आणि सोनार समाजाचा जाहीर उल्लेख केला.ओबीसी आरक्षण अस्तित्वाची जाणीव आणि लढाई आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ओबीसी आरक्षण अस्तित्वाची लढाईसाठी केल्या गेलेल्या आमरण उपोषणप्रसंगी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न देता अन्य विशेष कोट्यातून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी ओबीसी नेते आणि अन्न पुरवठा मंत्री ना श्री छगनराव भुजबळ यांच्या मार्फत सरकारला करण्यात आली होती.मराठा ओबीसी आरक्षण हरकत नोंद मोहीम गतिमान करण्यात आली.या सर्वांचा परिणाम म्हणून या नोंदी असणाऱ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी पत्रकार परिषदेत मुंबई येथे दिली.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेवर तातडीने अंमलबजावणी केली जावी, या प्रमुख मागणीसाठी गत सात दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यावर कल सकाळी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री ना. शिंदे म्हणाले की , मराठा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहवाल सुपूर्द करण्यात आला असून या अहवालावर विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल तसेच मराठा आरक्षणा साठी सरकार सकारात्मक असून, ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही असे आश्वासनही मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी दिले आहे.यासोबतच महत्त्वाचे म्हणजे जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, इ स १९६७ पूर्वीच्या जुन्या कुणबी नोंदी, त्यांचा वेगळा नियम आणि कायदा आहे. नवे मराठा आरक्षण हे कोणत्याही नोंदी नसणाऱ्यांना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. म्हणजेच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे दरम्यान, मराठा आरक्षणासाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या