🌟महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल जाहीर....!


🌟शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का ; अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं🌟

🌟अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह बहाल : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका🌟

मुंबई (दि.6 फेब्रुवारी) : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे

या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या