🌟नांदेड गुरुद्वारा बोर्ड अधिनियमा विरोधात आंदोलनाच्या ०९ व्या दिवशी आंदोलकांकडून भजन व किर्तन करून निषेध....!

🌟यावेळी जिल्हा प्रशासनाच्या थंड कारभाराचा थंड मठ्ठा पाजून निषेध करण्यात आला🌟

नांदेड (दि.१६ फेब्रुवारी) - राज्य शासनाने नव्याने संमत केलेल्या गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 च्या विरोधातील साखळी उपोषणाला नऊ दिवस झाले आहेत. राज्य शासन आंदोलनकर्त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी भजन व कीर्तन करून तसेच सहभागी आंदोलक व परिसराती नागरिक व वाटसरुंना प्रशासनाच्या थंड कारभाराचा थंड मठ्ठा पाजून निषेध करण्यात आला.


 गुरुद्वारा बोर्ड १९५६ मध्ये बदल करून राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुद्वारा बोर्ड अधिनियम २०२४ लादला आहे या विरोधामध्ये ०९ फेब्रुवारी पासून साखळी उपोषण सुरू आहेआजच्या आठव्या दिवशी जर्नल सिंग गाडीवाले,रवींद्रसिंग पुजारी,किरणसिंग शाहू, मनप्रीतसिंग कारागिर व खेमसिंग ग्रंथी यांनी यांनी उपोषणात भाग घेतला. राज्य शासन व प्रशासनाच्या थंड भूमिकेचा संताप व्यक्त करीत आज आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी परिसरातील नागरिक व वाटसरूंना थंडगार मठ्ठा वाटप करून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अशाच प्रकारे बेमुदत सुरू राहील असा निर्धार आंदोलन करताना केला आहे.

  यावेळी सरबजीतसिंग होटलवाले, गुरमीतसिंग महाजन, मनप्रितसिंग कुंजीवाले, अवतारसिंग पहरेदार, गुरमीतसिंग बेदी, भागींदरसिंग घडीसाज, रवींद्रसिंग बुंगई, राजेंद्रसिंग पुजारी, हरभजनसिंग पुजारी, मनबिरसिंग ग्रंथी , जगजीतसिंग , प्रेमजीतसिंग शिलेदार , ग्यानी तेगासिंग बावरी , जगदीपसिंग नंबरदार, अमरजीतसिंग गिल, हरजीतसिंग गिल, सुरीदरसिंग मेंबर, कश्मीरसिंग कारागीर, सुखविंदरसिंग हुंदल, इंदरसिंगशाहू , बिल्लू रंगी, अमरजीतसिंग बुंगई, बलजीतसिंग शाह, शरणपालसिंग कारागीर, सेवकसिंग रायके, सिंटूसिंग बॉडीवाले, कालूसिंग रागी, जसविंदरसिंग गल्लीवाले, राजूसिंग गिल, करणसिंग लोणीवाले , मनिंदरसिंग शाहू, रॉकीसिंग रामगडीया, भोलासिंग गाडीवाले, सुरजितसिंग फौजी, जसबीरसिंग बुंगई, मनिंदरसिंग रामगडीया, जप्पीसिंग लांगरी , हरभजनसिंग दिगवा,गुरप्रीतसिंग सोखी, किरपालसिंग हजुरिया जसबीरसिंग धुपिया , तेजपालसिंग खेड, राजेंद्रसिंग शाहू , प्रतापसिंग खालसा यांच्यासह शेकडो शिख बांधवांनी  सहभाग घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या