🌟पुर्णा तालुक्यातील देऊळगाव येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या दोन उपोषणार्थींची प्रकृती खालावली.....!


🌟अन्न पाण्याविना चार दिवस,महावितरण कडून विद्युत पुरवठा खंडित हे देखील प्रकृती बिघडण्याचे कारण🌟


परभणी : परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे मराठा आरक्षण अमलबजावणीसाठी मागील चार दिवसांपासून चार तरुणांनी आमरण उपोषण सूरु केले आहे. मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी दुपार नंतर उपोषणार्थींपैकी उद्धव टोपाजी दुधाटे मुंजा प्रल्हादराव दुधाटे या दोघांची प्रकृती खालावली आहे. यामुळे ग्रामस्थमात्र चिंताग्रस्त झाले आहेत.

मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्या लढ्यानंतर दि.२७ जानेवारी रोजी अधिसूचना काढली. त्या अधिसूचनेत सगे सोयरे हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु त्या अधीसूचनेचे  कायद्यात रूपांतर करण्यात आले नाही. त्यासाठी शासनाने सगेसोयरे हा शब्द कायमस्वरुपी करून सकल मराठा समाजाला हक्काचे ओबीसी आरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी  नवनाथ वैजनाथ दूधाटे,भगवान रामकिशन दूधाटे, मूंजा प्रल्हादराव दूधाटे,उद्धव टोपाजी दूधाटे यांनी देऊळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परीसरात आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. अन्न पाण्याविना तीन दिवस उपाशी राहिलेल्या दोन तरुणांची प्रकृती गंभीर होत आहे. दरम्यान प्रशासनाने या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

* महावितरणच्या भावनाशून्यतेबद्दल गावकऱ्यांत संताप :-

मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी रविवार दिनांक 11 फेब्रुवारीपासून देऊळगाव येथे आमरण उपोषण सुरू असताना महावितरण प्रशासनाने वसुलीच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित केला. तीन दिवस उघड्यावर आमरण उपोषणास बसलेल्या तरुणांना डासांचा त्रास झाला. यामुळे ते आजारी पडत असल्याचेमत उपोषणार्थीचे नातेवाईक व ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. दरम्यान महावितरण प्रशासनास भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून उपोषण सुरू आहे विद्युत पुरवठा सुरू ठेवा अशी विनंती सरपंच सौ ललिताबाई कांबळे, उपसरपंच दिगंबर दुधाटे यांनी विनंती करूनही विद्युत पुरवठा खंडित केला. वर्षभर टप्प्याटप्प्याने नियोजन शून्य महावितरण कंपनीला वीज बिलाचा भरणा केला असता नाही. मार्च यांच्या पार्श्वभूमीवर दाखवत असलेल्या या भावना शून्य ते बद्दल. ग्रामस्थांमधून महावितरण चा निषेध करण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या