🌟महाराष्ट्र सरकारने गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या नवीन कायद्याला स्थगिती मिळाली यासाठी मा.मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांना साकडे...!


🌟हुजूरी सिख समुदायाने घेतली मा.मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांची भेट : कलम ११ रद्द करण्याची देखील केली मागणी🌟 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते व नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य खा.अशोकराव चव्हाण यांची आज रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी हजुरी सिख समुदायाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी महाराष्ट्र सरकारने जुन्या गुरुद्वाऱा ॲक्ट १९५६ या कायद्यात संशोधनाच्या नावाखाली दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ हा कायदा गुरुद्वाऱ्यावर लादल्यामुळे व तत्पूर्वी २०१६ यावर्षी कलम ११ मध्ये संशोधन करून हुजूरी सिख समुदायाचा लोकशाही पद्धतीने गुरुद्वाऱा बोर्ड अध्यक्ष निवडीचा अधिकार सरकारने हिरावून घेतल्यामुळे स्थानिक हुजूरी सिख समुदायामध्ये तीव्र असंतोष पसरल्याचे यावेळी मा.मुख्यमंत्री श्री चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.


महाराष्ट्र सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या गुरुद्वाऱा २०२४ या कायद्या विरोधात संपूर्ण सिख समुदायात संतापाची लाट असल्यामुळे मागील दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सिख समुदायाच्या वतीने भव्य ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला व त्याच दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिख समुदायाकडून साखळी उपोषणासह निदर्शन आंदोलन देखील चालू असल्याने आपण या साखळी उपोषणाला भेट द्यावी तसेच सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या गुरुद्वाऱा अधिनियम-२०२४ हा कायदा तात्काळ रद्द करण्यासाठी हुजूरी सिख समुदायाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे साकडे देखील यावेळी शिष्टमंडळाने मा.मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांना घातले यावेळी खा.चव्हाण यांनी हुजूरी सिख समुदायाशी बोलतांना असे नमूद केले की महाराष्ट्र सरकारने सचखंड गुरुद्वारा अधिनियम-२०२४ या कायद्याला स्थगिती दिली आहे यावेळी सिख समुदायाकडून असा प्रश्न उपस्थित करण्यात आला की जर महाराष्ट्र सरकारने गुरुद्वाऱा अधिनियम २०२४ या कायद्याला स्थगिती दिली तर मग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील १७ दिवसांपासून सिख समुदायाकडून साखळी उपोषणासह निदर्शन सुरू असतांना शासनाने अद्याप पर्यंत तसा जीआर का काढला नाही ? आपण स्वतः याकडे जातीने लक्ष देऊन गुरुद्वाऱा अधिनियम-२०२४ हा नवीन कायदा रद्द करण्याच्यादृष्टीने पाऊल उचलावी व कलम ११ मधील संशोधन रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडून हुजूरी सिख समुदायाला त्यांचा मुलभूत धार्मिक अधिकार मिळवून द्यावा असे साकडे देखील यावेळी मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना घालण्यात आले यावेळी त्यांनी हुजूरी सिख समुदायाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देऊन उपोषणस्थळाला प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे देखील यावेळी हुजूरी सिख समुदायाला सांगितले.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांना भेटण्यासाठी गेलेल्या हुजूरी सिख समुदायाच्या शिष्टमंडळामध्ये स.रविंद्रसिंघ बुंगई,स.सुखविंदरसिंघ हुंदल,दिलीपसिंघ रागी,स.जसपालसिंघ लांगरी,स.जगजीतसिंघ खालसा,स,करणसिंघ खालसा,स,मनबीरसिंघ ग्रंथी,स,जसबीरसिंघ बुंगई,स,रवीसिंघ पुजारी,स.दिपकसिंघ हजुरीया,स.बलबीरसिंघ बुंगई,स.गुरदिपसिंघ संधु,स.प्रेमजोतसिंघ सुखई,स.डेन्जरसिंघ तबेलेवाले,स.हरदिपसिंघ कामठेकर,स.जसराजसिंघ बुंगई,स.मनजीतसिंघ ग्रंथी आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या