🌟महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबीर संपन्न....!


🌟शिवसेना परभणी जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या वतीने करण्यात आले होते महाआरोग्य शिबीराचे आयोजन🌟


परभणी : परभणी येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या वतीने आज शुक्रवार दि.09 फेब्रुवारी रोजी मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास माजी आमदार तथा लोकसभा समन्व्यक हरीभाऊ काका लहाने,मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. लखमावार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, नितेश भैय्या देशमूख यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.


या आरोग्य शिबीरामध्ये  नेत्ररोग तपासणी, मोतिबिंदु तपासणी,अंतर्गत 500 च्यावर नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले, जवळपास 500 च्या वर नागरिकांची दंतरोग व मुखविकार  तपासणी करण्यात आली,तसेच यावेळी मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड व पंतप्रधान जनआरोग्य योजना कार्डची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली,आणी मोठ्या संख्येने रक्तदान शिबीर देखील पार पडले,या कार्यक्रमास आयोजक जिल्हाप्रमुख व्यंकटराव भाऊ शिंदे यांच्या सह जिल्हाप्रमुख मागासवर्गीय विभाग धम्मदीपभाऊ रोडे, जिल्हाप्रमुख महिला गीता ताई सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख युवा दीपक टेंगसे, उपजिल्हाप्रमुख होगे पाटील,उपजिल्हाप्रमुख माणिक पोंडे,तालुका प्रमुख प्रभाकर कदम, तालुकाप्रमुख  वशिष्ठ धोपटे,तालुकाप्रमुख बंडू चव्हाण, तालुकाप्रमुख पवन राजे घुमरे,किशोर चव्हाण, अंबादास मदने,विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे, विधानसभा प्रमुख लक्ष्मीकांत तिडके, पाथरी शहर संघटक सुशांत भाऊ साळवे, शहर प्रमुख महेंद्रभाऊ, गाडेकर,मनोज पंडित, शहर संघटक विक्रम शिंदे, पाथरी शहर प्रमुख कृष्णा गिराम, अशोक भाऊ कराळे, शब्बीर भाई शेख, युवा शहर प्रमुख ईशान आवचार,युवा तालुका प्रमुख हरिभाऊ भरोसे, युवा उप शहर प्रमुख राहुल शिंदे, चेतन चरण,विधानसभा प्रमुख बोरीकर मॅडम, उपजिल्हाप्रमुख शिवमाला पकाने, कल्पना दळवी , उपजिल्हाप्रमुख सुवर्णा  देशमुख, महिला संघटक मालन ताई धोत्रे, शहर प्रमुख सिंधुताई चौधरी, युवा पदाधिकारी राणी ताई, उपशहर प्रमुख राज वाघमारे ,उपशहर प्रमुख झाडे ताई, गणेश सूळ,नरेश खैराजानी, भुजंग काळे, सदाभाऊ शिंदे,विठ्ठल तात्या गायकवाड, तुषार सोनकांबळे, हज्जूभाई शेख, फेरोझ शेख, मोबीन भाई शेख, संजू भाऊ पोळ,दत्ता काकडे, नागेश काकडे,मनेष गायकवाड, परमेश्वर चोपडे, बळीराम चोपडे,यासह मोठ्या संख्येने  पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या