🌟राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवस्वराज्य सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम......!


🌟वडगांव (रंगे) येथील गावकऱ्यांचे आयोजन ; बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती🌟

फुलचंद भगत

वाशिम :- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमीत्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभरात शिव स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात असून जिल्हाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी यांच्या मार्गर्शनाखाली तालुक्यातील वडगांव (रंगे) येथे दि. १८ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, पंचायत समिती सभापती प्रदीप देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती जयकिसन राठोड, राठोड सर, हमीद शेख आदींची मंचावर उपस्थिती होती. दरम्यान शिवाजी  शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता नैनीश रंगे, घनश्याम जोगे, आनंदा खडसे,  कैलास तलवारे, नानाभाऊ जोगे, शिवदास दाते, संतोष खाडे, अविनाश खाडे, हर्षव रंगे, अमोल लुंगाजी रंगे, गणेश कानडे, संजय इंगळे, कैलास लोखंडे,विनोद दाते गुलाबराव खाडे, रमेश पा.रंगे, गोलू मोहोळ, मंगेश रंगे, मधुकर रंगे गुलाबराव रंगे, रामराव रंगे, दिगंबर पाडे, युवराज भगत, अवधूत इंगळे, पवनपुरे प्रभाकर लोखंडे, अवधूत लोखंडे, नितीन खोपकर, संदीप रंगे, सुधीर रंगे, राजू पाटील रंगे, शालिग्राम जी जाधव,  देवानंद काललकर, संतोष वंजारी, अरुण अंबुरे, बबनराव खाडे, दिनेश खाडे, निलेश जुंबले, मनेश जोगे, पाणबुडे मोतीराम वंजारी, दिनेश लोखंडे, श्याम इंगळे, अनिल मलमकर, अमोल फंडे, साहेबराव रंगे, सुनील खाडे, अवधूत खाडे, संतोष रंगे, रमेश लोखंडे, प्रमोद टाके, बाबाराव प्रवीण पापडकर, सुभाष नागरगोजे, विजय काळे, प्रमोद कानडे, पिंटू सांगळे, बजरंग इगले, देविदास रंगे, आकाश रंगे, अतुल भरती, राजू लोखंडे, गोपाळ पाणबुडे, नंदू दाते, आकाश रंगे, मयूर काळे, अजय कले, वैभव काळे, विक्रांत लोखंडे, पवन रंगे, गजानन रंगे, संतोष खाडे, शिवराज मित्र मंडळ  आदींनी पुढाकार घेतला यावेळी बहुसंख्य गावकऱ्यांची उपस्थिती होती.

* शिवाजी महाराज जर मुस्लीमविरोधी असते तर मुस्लीम शिवरायांचे अंगरक्षक राहिले असते का ? - मो.युसुफ पुंजानी

त्याकाळात अनेक हिंदू सरदार मोगल-आदिलशहा आणि निजामांकडे होते,तर अनेक मुस्लीम सरदार शिवरायांकडे होते, यावरून स्पष्ट होते की, शिवकालीन लढा धार्मिक नव्हता. छत्रपती शिवाजीराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचे स्वराज्य हे सर्व जातीधर्मातील जनतेचे स्वराज्य होते. शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदाभेद केला नाही. त्यांना साथ देणारे मराठा, माळी, धनगर, रामोशी, मातंग, महार, आग्री, वंजारी, कोळी इत्यादी होते तसेच त्यांच्या सैन्यात मुस्लीमदेखील होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या