🌟परभणी येथे पश्चिम विभागीय कृषि मेळाव्यात अभिरूप मतदान केंद्राचा स्टॉल.....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते अभिरूप मतदान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले🌟


परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे 21 ते 23 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत पश्चिम विभागीय कृषि मेळावा व प्रदर्शन 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर कृषि मेळावा व प्रदर्शनामध्ये विविध विभागाची माहिती दर्शविणारे स्टॉल उभारण्यात आले आहेत. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये मतदानाप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशाने याठिकाणी अभिरुप मतदान केंद्र उभारण्यात आले आाहे. या भव्य कृषी प्रदर्शनास येणाऱ्या अनेक व्यक्ती सदर केंद्रास भेट देत असुन, नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भेट देणारे नागरीक सदर केंद्रावर ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम वर मतदान करत आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न व शंकाचे निरसन कक्षातील अधिकारी-कर्मचारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते अभिरूप मतदान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, तहसिलदार संदीप राजपुरे, निवडणूक नायब तहसीलदार सतीश रेड्डी व निवडणूक अव्वल कारकून दत्ता  गिनगिने यांची उपस्थिती होती.......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या