🌟महाराष्ट्र सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या नवीन कायद्या विरोधातील साखळी उपोषणाला आज ११ वा दिवस🌟
नांदेड (दि.१९ फेब्रुवारी) - नवीन गुरुद्वारा बोर्ड अधिनियम-२०२४ च्या विरोधात मागील अकरा दिवसापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंग यांना घेराव घालून संताप व्यक्त केला. यावेळी विजय सतबीरसिंग यांनी शासनाचा प्रतिनिधी असल्याने विरोध करता येणार नाही परंतु समाजाच्या सोबत असल्याचे सांगितले.
गुरुद्वारा बोर्ड 1956 रद्द करून राज्य शासनाने नवीन गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 संमत केला आहे या कायद्याविरोधात शिख समाजाच्यावतीने मागील अकरा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणाला प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मोठा संतोष निर्माण झालेला आहे. आंदोलनाच्या अकराव्या दिवशी आज सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी गुरमीतसिंग बेदी व किरपालसिंग हजुरीया यांनी उपोषण केले तर शेरसिंग फौजी, रवींद्रसिंग बुंगई, राजेंद्रसिंग पुजारी, भागींदरसिंग घडीसाज, अवतारसिंग पहरेदार, दिपकसिंग गल्लीवाले, दीपकसिंग हजुरिया, अमरजितसिंग गिल, तेजपालसिंग खेड, विरेंद्रसिंग बेदी, हरभजनसिंग दिगवा, महेंद्रसिंग पैदल, भोलासिंग गाडीवाले, किरणसिंह शाहू, ग्यानी तेगासिंग बावरी, जगजीतसिंग खालसा, हरभजनसिंग पुजारी, प्रेमजीतसिंग शिलेदार यांनी सहभाग घेतला
गुरुद्वारा बोर्डाच्या सामूहिक विवाह मेळाव्याच्या नियोजनाकरिता बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंग नांदेड येथे आले आहेत. याची माहिती प्राप्त होताच संतप्त आंदोलनकर्त्यांनी अंगददेवजी यात्री निवास येथे थांबलेले बोर्ड प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंग यांना आंदोलकांची बाजू राज्य सरकारसमोर मांडण्यासाठी अक्षरशः घेराव घातला. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक ठाणसिंग बुंगई व बॉबी वीरजीदिल्लीवाले उपस्थित होते. जवळपास 20 मिनिट झालेल्या चर्चेनंतर डॉ. विजय सतबीरसिंग यांनी मी स्वतः राज्य शासनाचा प्रतिनिधी असल्याने शासनाविरोधात वक्तव्य करता येणार नाही अथवा शासनाच्या धोरणांचा विरोध करता येणार नाही असे सांगितले. परंतू समाजाशी असलेली बांधीलकीमुळे मी व्यक्तीशः आंदोलक व शिख समाजासोबत असल्याचे सांगितले तसेच आंदोलनकर्त्यांची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे ठेवण्यांचे आश्वासन दिले.
यावेळी गुरमीतसिंग महाजन, मनप्रितसिंग कुंजीवाले, जर्नलसिंग गाडीवाले, जसपालसिंग लांगरी , मनप्रीतसिंग कारागीर, कश्मीरसिंग भट्टी, रवींद्रसिंग पुजारी, गुरप्रीतसिंग सोखी, मंनबिरसिंग ग्रंथी, अमरजीतसिंग कुंजीवाले, गुरुदीपसिंह संधू, मनिंदरसिंग रामगडिया, जसबीरसिंग बुंगई, जगदिपसिंग नंबरदार व हरजितसिंग गिल व अमरप्रितसिंग हांडी यांनी सहभाग घेतला.
* शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदा बोंढारकर यांनी दिला आंदोलनाला पाठिंबा :-
सोमवारी आंदोलनाला शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदा बोंढारकर यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून जाहीर पाठिंबाचे पत्र दिले. यावेळी दर्शनसिंग सिद्धु, तुलजेश यादव, अशोक उमरेकर, बिल्लू यादव, गुरमीतसिंग टमाना, लड्डूसिंग कारगर , तिरथसिंग कडेवाले सोबत होते.
0 टिप्पण्या