🌟राज्य मंडळामार्फत समुपदेशकांची नियुक्ती : विद्यार्थ्यांनी परिक्षेचे मानसिक दडपण आल्यास समुपदेशकांशी संपर्क साधावा....!


🌟असे आवाहन विभागीय सचिव छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे🌟

परभणी (दि.29 फेब्रुवारी) :  इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचार आणि परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. त्यासाठी राज्य शिक्षण मंडळामार्फत जिल्ह्यासाठी पी.एम. सोनोने, समुपदेशक, बालविद्या मंदिर (मो.नं. 9422178101) आणि अमीर खान अजमत खान, से.नि. डॉ. जाकीर हुसैन हायस्कुल (मो.नं.9860444986) या दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेचा ताण आलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी हे समुपदेशक ऑनलाईन समुपदेशन करणार आहेत. मोबाईल क्रमांकावरुन नि:शुल्क समुपदेशन केले जाईल, तरी तणावग्रस्त विद्यार्थी व पालकांनी समुपदेशक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विभागीय सचिव छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या