🌟परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मानाच्या संदलचा तबक डोक्यावर घेऊन केली ऊरूस यात्रेची सुरुवात...!


🌟मागील ११६ वर्षापासून या मानाच्या संदलची परंपरा कायम : राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित🌟 

परभणी (दि.०१ फेब्रुवारी) : महान सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांची परभणी येथील दरगाह सर्व धर्म समभावाचे, एकात्मतेचे प्रतिक असून, सर्व जिल्हावासियांची हे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज दुपारी रेल्वे स्टेशन परिसरातून हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या मानाच्या संदलची शहरातून मिरवणुक काढुन ऊरूस यात्रेची सुरुवात झाली. 

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर., वक्फ मंडळाचे विभागीय अधिकारी व उरुस समितीचे व्यवस्थापक खुसरो खान, जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद अमिनुज्जमा आदी उपस्थित होते. मागील ११६ वर्षापासून या मानाच्या संदलची परंपरा आजतागायत कायम असून, या यात्रेला देश व राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. 

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संदलचा तबक डोक्यावर घेवून संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या ऊरूस यात्रेला मानाच्या संदलाने सुरुवात झाली. नागरिकांनी या उरूस उत्सवात सहभागी होवून कायदा व सुव्यवस्थाचे पालन करून शांततेत पार पडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे....

     ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या