🌟नांदेड सचखंड गुरुद्वारा रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणा विरोधात महानगर पालिकेची कारवाई : अनेक व्यवसायिकांना फटका...!


🌟उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांच्या पथकाने केली कारवाई🌟

🌟रस्त्यावरील हातगाडेवाल्यांमुळे स्थानिक दुकानदारांना फटका : स्थानिक दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान🌟

🌟मनपा स्थानिक दुकानदारांना दुकान चालवण्यासाठी रस्त्याच्या आसपास सीमा निर्धारित (मार्काऊट) करुन देण्याची होतेय मागणी🌟 


नांदेड :- नांदेड येथील पवित्र तिर्थक्षेत्र सचखंड गुरुद्वारा रस्त्यावर बेकायदेशीररीत्या जागोजागी दुकानासमोर लागलेल्या हातगाड्यांमुळे तिरथयात्रेकरुंसह रहदारीला देखील या रस्त्यावरुन मार्गक्रमण करतांना होणारा त्रास लक्षात घेता येथील सामाजिक कार्यकर्ते सरदार जगदिपसिंघ नंबरदार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेनुसार आज गुरुवार दि.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०-०० ते ०१-०० वाजेच्या सुमारास नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सचखंड गुरुद्वारा गेट नंबर ०१ ते गुरुद्वाऱा चौरस्ता पर्यंतचे अतिक्रमण काढण्याची धडक कारवाई उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून करण्यात येत असतांना यांचा फटका हातगाडेवाल्यांना कमी व स्थानिक दुकानदारांनाच मोठ्या प्रमाणात असल्याचे यावेळी निदर्शनास आले यावेळी महानगर पालिकेच्या पथकाने अनेक दुकानांवर उन्हाचा त्रास होता कामा नये याकरिता बसवलेले टिनशेड देखील जेसीबी यंत्राच्या साहाय्याने उखडून जप्त केल्यामुळे अनेक दुकानदारांच्या व्यवसायावरच जणुकाही या राक्षसी यंत्राचा पंजा चालल्याने अनेकांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आल्याचे देखील पाहावयास मिळाले.


या संदर्भात अधिक माहिती अशी की नांदेड़ शहरातील मध्यवर्ती भाग म्हणुन ओळख असणाऱ्या व सिख समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या गुरुद्वारा परिसरातील अतिक्रमणा संदर्भात स.उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे दाखल जनहित याचिका क्र.११४/२०१८ मधील अवमान याचिका क्र.१५१/२०२० या प्रकरणात स.उच्च न्यायालयाने दि.०४.०१.२०२४ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार सदरील अतिक्रमण काढण्याची कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त श्री गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स.अजितपालसिंग संधु यांनी आज गुरुवार दि.२२ फेब्रुवारी रोजी फुटपाथवरील हातगाडे धारक किरकोळ व्यापारी व इतर अतिक्रमन धारकांवर कारवाई करून रहदारीस व पादचार्‍यांसाठी जागा मोकळी करून देण्याची मोहीम राबवली सदरील कारवाई महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग, मालमत्ता विभाग, क्षेत्रिय कार्यालय तसेच पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली.

महापालिकेने नजिकच्या कालावधीत शहरातील इतर भागांमधील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्याची योजना आखली असुन त्यानुसार महानगरपालिका मालकीच्या जागेवर कोणीही अतिक्रमण करू नये अन्यथा नियमानुसार कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपायुक्त स.अजितपालसिंग संधु यांनी दिला आहे.सदरील अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाहीमध्ये उपायुक्त स.अजितपालिसिंघ संधू, क्षेत्रिय अधिकारी श्री मिर्झा फरहतउल्ला बेग, श्री रमेश चौरे, श्री रावण सोनसळे, श्री संभाजी कास्टेवाड,  सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभाग श्री मल्हार मोरे, सहाय्यक आयुक्त श्री संजय जाधव, क्षेत्रिय अधिकारी, सौ.निलावती डावरे तसेच श्री कदम, पोलिस निरीक्षक, वजिराबाद पोलिस स्टेशन, श्री वटाने, पोलिस उपनिरीक्षक, वजिराबाद पोलिस स्टेशन व त्यांचे पथक तसेच महानगरपालिकेतील इतर कर्मचारी उपस्थित होते......
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या