🌟श्री बाकलीवाल विद्यालयातील पियुष ईढोळे व तन्मय जावळे या दोन चॅम्पियन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड🌟
फुलचंद भगत
वाशिम - गोंदिया जिल्हा चॉकबॉल असोशिएशनच्या वतीने गोंदिया येथे पार पडलेल्या ११ व्या ज्युनिअर व सब ज्युनिअर महाराष्ट्र राज्य चॉकबॉल असोशिएन चॅम्पियनशीप २०२३-२४ या स्पर्धेत श्री बाकलीवाल विद्यालय व ऊच्च माध्यमिक विद्यालयाचे तन्मय जावळे, विवेक शेळके, कार्तिक ईढोळे, यशराज ईढोळे, पियुष ईढोळे,अक्षय इंगोले, हर्षवर्धन देशमुख,आयुष तायडे हे आठ विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यापैकी पियुष ईढोळे व तन्मय जावळे या दोन चॅम्पियन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन त्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुरेंन्द्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभिवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, क्रीडा शिक्षक अहिर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना दिले आहे.....
0 टिप्पण्या