🌟 पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील तिन दिवसीय तरंगल हनुमान यात्रेला आज दि.२४ फेब्रुवारी पासून प्रारंभ.....!


🌟या तरंगल हनुमान यात्रेची 400 वर्षांची परंपरा आहे🌟

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील, तरंगल यात्रा ही सर्वदूर  प्रसिद्ध आहे येथील हनुमानाची मूर्ती एक टन शेंदुरात माखलेली आहे मराठवाडा आंध्रप्रदेश, हनुमानाच्या दर्शनासाठी भाई मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात आणि या यात्रेची 400 वर्षांची परंपरा आहे म्हणून या यात्रेला आज शनिवार दि.24 फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला आहे

सदरील यात्रा शनिवार रविवार,सोमवार.अशी तिन दिवस भरणार आहे या यात्रेस बाहेर गावाहून आलेल्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे परीसरातुन मोठ्या संख्येने भाविकांची ये जा असते  आणि शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजता  गावातील लहान  मुले बच्चे कंपनी  व महिला,लेकी बाळी , पुरणपोळीचा नैवेद्य  व आरत्या घेऊन सर्व महिला एकत्रित जमा होऊन मारुतीरायांना आरत्या घेऊन जातात आणि पुरण पोळीचा महाप्रसाद घरी आल्यानंतर घेतात अशी या यात्रेची ओळख आहे परिसरातील भाविक बैलगाडी मध्ये बसून येत असतात चुडावा पोलीस स्टेशन ने या यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, आज सकाळी सहा वाजता मानाचा अभिषेक तुकाराम सदाशिव ढोणे यांच्या हस्ते करण्यात आला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या