🌟राज्यात मुख्यमंत्री महिला सबलीकरण योजना राबवण्याचा संकल्प....!


🌟मुंबई येथे महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला निर्णय🌟 


मुख्यमंत्री महिला सबलीकरण योजना राबवण्यात येण्याचा संकल्प आज मुंबई येथे महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या बैठकीस महिला पदाधिकारी हजर होत्या. दहा हजार बचत गटांपर्यंत ही योजना पोहचवण्यात येणार आहे, महिला ग्रह उद्योगाच्या महाराष्ट्राच्या प्रमुख श्रीमती संगीता कुलकर्णी, महिला उद्योग संयोजिका श्रीमती सेजल कदम,नाशिक विभागातील श्रीमती शिल्पा पारनेरकर, इंद्रायणी पाटील, कोल्हापुरी इथून ऋतुजा कोळी, बारामती येथील वंदना संतोष रांगणेकर, ठाणे विभागातील शिल्पा वाघ, स्वाती महेश थोरात, मराठवाडा इथून ऋचा जोशी, राजश्री निरपणे इत्यादी बचत गटाचे प्रतिनिधी हजर होते.

उद्योग आघाडीच्या  प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये रामकृष्णा आवारे, सुधीर नाईक, रामप्रसाद दांड, संजय कावडे, मिलिंद भालेराव,हजर होते.भारतीय जनता पार्टीच्या मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या