🌟या खुल्या वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक ७००१/- तर लहान गटासाठी प्रथम पारितोषिक ३००१/-🌟
सोनपेठ (दि.०७ फेब्रुवारी) - सोनपेठ येथील जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा -२०२४ निमित्त शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
जय भवानी मित्र मंडळ सोनपेठ आयोजित या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे खुला गटासाठी १) आरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली २) श्वासात राजे शिव छत्रपती, ध्यासात राजे शिव छत्रपती ३) लय अवघड हाय गड्या, उमगाया बाप रं ४) भय इथले संपत नाही ५) ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासी कळस आदी पाच विषय तर लहान गटासाठी १) आई मला खेळायला जायचंय,जाऊ दे नवं २) स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ३) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ४) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ५) कावळा करतो काव काव, एक तरी झाड लाव हे पाच विषय आहेत.
*या वक्तृत्व स्पर्धेसाठी खुल्या गटातील स्पर्धांसाठी प्रथम पारितोषिक ७००१/-रुपयें रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर द्वितीय पारितोषिक ४००१/-रपये रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर तृतीय पारितोषिक ३००१/-रुपयें रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,चतुर्थ पारितोषिक २००१/-रुपयें रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर पाचवे पारितोषिक १००१/- रुपयें रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे राहणार असून लहान गटातील स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक ३००१/- रुपयें रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर द्वितीय पारितोषिक २००१/- रुपयें रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर तृतीय पारितोषिक १००१/- रुपये रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर चतुर्थ पारितोषिक ७५१ रुपयें रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर पाचवे पारितोषिक ५५१ रुपयें रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे ठेवण्यात आले असून स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत :-
१.स्पर्धेसाठी खुला गट वय मर्यादा वय वर्ष 16 ते 30
*स्पर्धे साठी लहान गट वय मर्यादा वय वर्ष 10 ते 15*
२.*स्पर्धेचे माध्यम मराठीच असेल*.
३. *स्पर्धा दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी होईल*
४. *स्पर्धेत सादरीकरणासाठी वेळ खुला गट ५+2=७ मिनिटे आणि लहान गट ४+१=५ मिनिटे असेल*
५.*परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहिल.*
६. *स्पर्धेच्या नियमात ऐनवेळेस बदल करण्याचा हक्क संयोजकांकडे राखीव आहे.*
७. *स्पर्धेच्या दिवशी रात्री सोनपेठ शहरा बाहेरील स्पर्धकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाईल.*
८. *स्पर्धेसाठी शुल्क खुला गट 150 रुपये आणि लहान गट 50 रुपये आसून, प्रवेश शुल्क phone pay करून प्रवेश निश्चित करावा ( फोन पे no. 9637692579 प्रशांत शिंगाडे सर)*
९. *सदरील स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपताच दिला जाईल व बक्षीस वितरण स्पर्धेच्या ठिकाणीच केले जाणार आहे.
यमुख्य संयोजक :-
बळीभाऊ काटे संस्थापक अध्यक्ष जय भवानी मित्र मंडळ सोनपेठ*- 8180929999
*संयोजन समिती*
*सन्माननीय सदस्य जयभवानी मित्र मंडळ सोनपेठ*
*अधिक माहितीसाठी संपर्क* :-
*शिवश्री प्रशांतजी शिंगाडे -9637692579
*शिवश्री सुभाष कदम -9970995515
***************
स्पर्धेचे ठिकाण :- साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक सोनपेठ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी
0 टिप्पण्या