🌟परभणी जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्तीकरीता अर्जाची मागणी....!


🌟जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांसाठी काम करणाऱ्या 3 नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधींची नेमणूक होणार🌟 

परभणी (दि.31 जानेवारी) :  राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी तसेच स्थानिक अल्पसंख्यांकाच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुषंगाने जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांसाठी काम करणा-या 3 नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी याचे नामनिर्देशने शासनास पाठविण्यासाठी जिल्हास्तरावर अर्ज/प्रस्ताव विहित नमुन्यात मागविण्यात येत आहेत संस्थेचे आयुक्त धर्मदाय किवा इतर प्राधिकरण यांनी प्रदान केलेले नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे धार्मीक/भाषीक अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झालेले प्रमाणपत्र, संस्थेचे घटना व उद्देश, संबंधित संस्था यांच्या सदस्यामध्ये कोणतेही न्यायीक वाद नसल्याबाबत रुपये 100 च्या अर्धन्यायीक कोर्ट फीस स्टॅम्प पेपरवर नोटरीकृत प्रमाणपत्र, संस्थेचे प्रतिनिधी हे परभणी जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र सर्व कागद पत्रे सोबत जोडावेत.

तरी इच्छुक सदस्यांनी आपले अर्ज दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पर्यन्त सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे विहित नमुन्यात (नाव, पत्ता, जन्म दिनांक, व्यवसाय, शिक्षण, मोबाईल नं. ई-मेल, सामाजिक क्षेत्रात कार्य केलेबाबत माहिती) सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या