🌟महाराष्ट्रतील वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्च रोजी महाराष्ट्र होणार अंधारमय ?


🌟वीज कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला सुरुवात : राज्यावर वीज संकट तिन्ही कंपन्याचे कंत्राटी कर्मचारी संपावर🌟

नागपूर (दिल.२८ फेब्रुवारी) : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्तकृती समितीच्या वतीने राजव्यापी आंदोलनाला ९ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून यावेळी सर्व 28 संघटनांचे पदाधिकारी आणि कंत्राटी कामगार हे दिनांक 28 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारी 2024 ला (मध्य रात्रीपासून) नागपूर येथील विद्युत भवन काटोल रोड येथे संपावर जाऊन एकत्रित होऊन संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगार एकत्रित होऊन काम बंद आंदोलन केलेत.

यावेळी विकी कावळे, योगेश सायवणकर, अभिजीत माहुलकर, सुकेश गुर्वे, समीर हांडे, नितीन शेंद्रे, सचिन काळबांडे, सचिन राऊत, अनिवेश देशमुख, कुणाल जिचकार, दिनेश काळे उपस्थित होते. कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी ते सतत आंदोलन करीत आहे. कंत्राटी कामगारांना 30 टक्के पगार वाढ देण्यात यावी. तसेच वयाच्या 60 वर्ष शाश्वत रोजगाराची हमी देण्यात यावी. आणि इतरही कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या. यासाठी महाराष्ट्रातील विज महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण मधील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनांनी व संयुक्तकृती समिती च्यावतीने पदाधिकारी यांनी विद्युत भवन काटोल रोड येथे असंख्य कंत्राटी कामगारांनी आंदोलन केले महाराष्ट्रातील वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्च रोजी पूर्ण महाराष्ट्र अंधारमय होण्याचे इशारा दिलेला आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या