🌟महाराष्ट्रतील वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्च रोजी महाराष्ट्र होणार अंधारमय.....!


🌟यावेळी कामगार नेत्यांसह असंख्य कंत्राटी कामगार उपस्थित होते🌟

नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 च्या वतीने राजव्यापी आंदोलनाला ९ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून यावेळी अपर कामगार आयुक्त नागपूर यांना समितीच्या वतीने निवेदन सादर करते वेळी विकी कावळे, सुकेश गुर्वे, अभिजीत माहुलकर आणि योगेश सायवणकर हे कृति समिती पदाधिकारी उपस्थिती होते. 

कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी ते सतत आंदोलन करीत आहे कंत्राटी कामगारांना 30 टक्के पगार वाढ देण्यात यावी. तसेच वयाच्या ६० वर्ष शाश्वत रोजगाराची हमी देण्यात यावी. आणि इतरही कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या. यासाठी महाराष्ट्रातील 28 कंत्राटी कामगार संघटना एकत्रित येऊन आंदोलन करीत आहे. शुक्रवार दि.16 फेब्रुवारी रोजी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण मधील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने अप्पर कामगार आयुक्त कार्यालयासमोर पदाधिकारी यांनी कंत्राटी कामगारांना संबोधित केले. यावेळी असंख्य कंत्राटी कामगार उपस्तिथ होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या