🌟माऊली कॉलेजचे अभिरंग 2024 वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात....!


🌟या स्नेहसंमेलनासाठी कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणुन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांची उपस्थिती🌟                                       

 फुलचंद भगत

वाशिम : माऊली बहुउद्देशीय सामाजिक संस्था कोंडाळा (धाम) अतर्ंगत माऊली इन्स्टिट्युट ऑफ फॉर्मसी व माऊली इन्स्टिट्युट ऑफ पॅरामेडीकल कॉलेजचे अंभिरंग 2024 वार्षिक स्नेहसंमेलन व पदवीका वितरण समारंभाचे आयोजन उत्साहात पार पाडले.


या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणुन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लक्ष्मणराव बुंधे, प्रमुख अतिथी म्हणुन वाशिम जिल्हयाचे केमिस्ट ऍन्ड ड्‌रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष  राजेश शिरसाठ व प्रमुख मार्गदर्शक चव्हाण तसेच माऊली इन्स्टिट्युट ऑफ फॉर्मसी अँन्ड रिर्सच सेंटरचे प्राचाय सुनिल भोयर व माऊली इन्स्टिट्युट ऑफ पॅरामेडीकल कॉलेजचे प्रभारी प्राचार्य आंनद पांडे, माऊली महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ मोहिनी रविंद्र बुंधे, एल टी. बुंधे महाविद्यालयाचे प्राचार्य गोपाल घुले व माऊली फॉर्मसीचे विभाग प्रमुख संदीप मुखमाले तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सुनिल भोयर यांनी केले.

उद्‌घाटक निलेश सोमाणी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आई- वडील व महाविद्यालयाचे नाव मोठे करून राष्ट्र उभारणीसाठी मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन केले.त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मान्यवराच्या हस्ते ज्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये व सांस्कृतीक स्पर्धामध्ये क्रंमाक पटकावले होते अशा विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ज्या विद्यार्थ्यांना माऊली इन्स्टिट्युट ऑफ पॅरामेडीकल कॉलेजमधुन पिजीडीएमएल या अभ्यासक्रमामध्ये प्रथम क्रंमाक आकाश भानुदास पवार, व्दितीय तृप्ती दिलीप वानखेडे, तृतीय क्रंमाक अतिया जागिरदार तसेच सर्व यश मिळवणार्‍या विद्यार्थ्याना पदवीका देवुन त्यांच्या आईवडीलांसोबत सत्कार करण्यात आला.सदरील वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये माऊली टंकलेखन व लघुलेखन संस्थेतील शिक्षक अजय हरिकिसन राठोड यांची आरोग्य विभाग नाशिक येथे स्टेनो टायपिस्ट या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते आईवडीलासह सत्कार करण्यात आला त्यासोबतच लघुलेखन संस्थेमधील विद्यार्थी ज्यांची जिल्हा परिषद व जिल्हा सत्र न्यायालय कंत्राटी पदावर रुजु झाले त्यांचाही सत्कार करण्यात आला.

वार्षिक स्नेहसंमेलन दि 20 फेब्रुवारी पासुन विविध प्रकारच्या खेळाचे व सांस्कृतीक कार्यक्रमाच्या सादरीकरनातुन लोकनृत्य, महिला सशक्तीकरण, स्त्री भ्रूण हत्या अशा अनेक समस्याला वाच्या फोडुन भारतीय संस्कृती जोपासणारे समाजाला प्रबोधन करणारे कार्यक्रमाचे आयोजन हे विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव मिळाण्यासाठी घेण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलन यशविरित्या पार पाडण्यासाठी प्रा योगेश कावडे , प्रा. सागर जाधव, प्रा सचिन इढोळे , प्रा. पौणिमा पांडे , प्रा. कु मयुरी गोटे, प्रा कु निकिता बुंधे, प्रा कु ऋतुजा अढाव, शिक्षक अजय राठोड, दयासागर अंभोरे, सचिन बुंधे, भुषण देशपांडे, भावेश गोरे, कु. प्रतिभा पाटील, दिव्या निबंलवार, विजया देशमुख,अशिष कव्हर, श्रिकांत मोरे, या शिक्षकवृदांनी अथक परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रा. घुले सर, सहा. प्राध्यापक कु. ऋतुजा अढाव तर आभार प्रा. संदिप मुखमाले यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या