🌟पुर्णा नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कारभार म्हणजे 'देव द्यायला अन् पदर नाही घ्यायला' ?


🌟पाणीसाठा उपलब्ध पण वाचवणार कसा ? : कोल्हापूरी बंधाऱ्याची गळती थांबवण्यात नगर परिषद प्रशासन पुन्हा अपयशी🌟


🌟पुर्णा नदीपात्रावरील कोल्हापुरी बंधाऱ्यातून होणारी पाणी गळती तात्काळ थांबवण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी🌟

पुर्णा (दि.२१ फेब्रुवारी) - पुर्णा नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचा कारभार 'देव द्यायला अन् पदर नाही घ्यायला' ? एकंदरीत अश्या पध्दतीचा झाल्याचे निदर्शनास येत असून तब्बल पंधरा दिवसांच्या कालावधी नंतर देवदेवा करुन पुर्णा नदीपात्रावरील कोल्हापुरी बांधाऱ्यात उपलब्ध झालेला पाणीसाठा कोल्हापूरी बंधाऱ्याला लागलेल्या गळतीमुळे लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात असतांना मात्र पाण्याची सातत्याने होत असलेली गळती रोखण्यास नगर परिषद प्रशासन अपयशी ठरत असल्याने निदान दोन महिने पुरणारा पाणीसाठा अल्पशा कालावधीत संपण्याची चिन्हं दिसू लागली आहे. 


पुर्णा शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पुर्णा नदीपात्रावर कोल्हापूरी बंधारा बांधण्यात आला होता या बंधाऱ्यातून मागील अनेक वर्षापासून शहरातील जवळपास चाळीस हजार पूर्णेकरांना पाणीपुरवठा केला जातो परंतु मागील महिन्यात पुर्णा शहराला जवळपास तिन आठवड्याच्या वर पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते अथक प्रयत्नांनंतर प्रशासनाने सिद्धेश्वर धरणातील २.२ क्रूसेस लिटर पाणी सोडण्यात आलं परंतु तत्पूर्वी नगर परिषद प्रशासनाने कोल्हापूरी बंधाऱ्याच्या दरवाजांची दुरुस्ती न केल्यामुळे कोल्हापुरी बांधाऱ्यातील पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे  पुर्णा नदीपात्रावरील कोल्हापुरी बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर गेले असता कोल्हापुरी बांधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरू असल्याचे त्यांना निदर्शनास आले अश्याच प्रकारे कोल्हापूरी बंधाऱ्यातून पाण्याची गळती सुरू राहिली तर एका महिन्याच्या आत नदीपात्रातील पाणी साठा वाहून जाईल व येणाऱ्या भर उन्हाळ्याच्या दिवसात पुर्णा शहवासीयांना भिषण पाणी टंचाई सारख्या प्रश्नाला सामोरे जावे लागेल याविषयी नगरपालिका प्रशासनान व जलसंपदा विभागाने लक्ष देऊन तात्काळ पाणी गळती थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर यांनी दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या