🌟भोगवटदार वर्ग-2 च्या जमिनीचे रुपातंर भोगवटादार वर्ग-1 मध्ये 7 मार्चपर्यंत करावे : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟भोगवटदार वर्ग-2 चा वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणेसाठी शासन अधिसूचनेतील तरतूदीनुसार विहीत कालमर्यादेत कारवाई🌟

परभणी (दि. 29 फेब्रुवारी) :  महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणे) नियम, 2019 च्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-1 मध्ये सवलतीच्या दराने रुपांतरीत करण्याचा कालावधी हा अधिसूचनेच्या दिनांकापासून 3 वर्षांपर्यंतचा होता. हा कालावधीत दि. 27 मार्च, 2023 च्या अधिसूचने नुसार सवलतीच्या दराने धारणाधिकार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्याचा कालावधी हा 3 वर्षांच्या ऐवजी 5 वर्ष करण्यात आला आहे. तसेच नवीन परंतुक देखील समाविष्ट करण्यात आलेले आहे.  

दि. 27 मार्च, 2023 रोजीच्या अधिसूचनेतील तरतूदीनुसार सवलतीच्या दराने भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीचे रुपांतर भोगवटादार वर्ग-1 मध्ये करण्याबाबतचा कालावधी हा दि. 7 मार्च, 2024 रोजी संपुष्टात येत असून यासंदर्भात प्राप्त झालेल्या अर्जापैकी कोणा अर्जदारास / संस्थेस अधिमूल्याची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या असल्यास, अधिमूल्याची रक्कम चलनाने दि. 7 मार्च, 2024 पूर्वी भरण्यात यावी. जे अर्जदार / संस्था दिलेल्या मुदतीत अधिमूल्याची रक्कम भरणा करतील त्यांनाच या सवलत योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मुदतीनंतर अधिमूल्याची रक्कम भरल्यास सवलतीच्या दराचा लाभ मिळणार नाही.

भोगवटादार वर्ग-2 चा धारणाधिकार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणे संदर्भात अर्जदारांची जी प्रकरणे कागदपत्रांच्या अभावी अपुर्ण राहतील अशा प्रकरणात शासनाची जबाबदारी राहणार नाही. तसेच परिपुर्ण असलेले एकही प्रकरण आपल्या स्तरावर प्रलंबित राहणार नाही याचीही दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधीत अधिकारी-कर्मचारी यांना दिले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या