🌟गुरुद्वारा बोर्ड निवडणुकीत गुरसिखीशी एकनिष्ठ असलेल्या मराठवाड्यातील मतदारांचा मतदानाचा हक्क कायम ठेवावा...!


🌟सिख सिकलीगर समाज बांधवांची सन्माननीय मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंगजी व गुरुद्वाऱा बोर्ड अधिक्षकांकडे मागणी🌟


नांदेड - महाराष्ट्र सरकारने दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुना गुरुद्वाऱा ॲक्ट १९५६ या कायद्यात संशोधनाच्या नावाखाली बदल करुन नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ हा कायदा पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादल्यामुळे संपूर्ण सिख समुदायामध्ये असंतोषासह असुरक्षितेची व संभ्रमावस्थेची भावना निर्माण झाली आहे.


महाराष्ट्र सरकारने गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या नवीन कायद्यामुळे आपल्या मुलभूत धार्मिक अधिकारांवर गधा येणार असल्यामुळे संपूर्ण हुजूरी सिख समुदाय संतप्त झाला आहे सरकारने लादलेल्या नवीन कायद्या विरोधात मागील दि.०९ फेब्रुवारी २०२४ पासून संपूर्ण हुजूरी सिख समुदाय या कायद्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रथमतः ऐतिहासिक मोर्चा व यानंतर सातत्याने साखळी उपोषण/निदर्शन करीत असून सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेला नवीन कायदा तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसह जुन्या गुरुद्वारा ॲक्ट १९५६ या कायद्यातील कलम ११ मधील संशोधन रद्द करुन गुरुद्वाऱा अध्यक्ष निवडण्याचा लोकतांत्रिक अधिकार हुजूरी सिख समुदायाला देण्याची व पुर्वीचा जुना गुरुद्वारा ॲक्ट हा कायदा कायम ठेवून लोकमतातून निवडून येणाऱ्या स्थानिक सदस्यांची संख्या तीन वरुन सात किंवा नऊ करण्याची मागणी करीत असतांनाच आज मंगळवार दि.२७ फेब्रुवारी रोजी गुरसिखीशी एकनिष्ठ असलेल्या व गुरुद्वाऱा बोर्ड निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या सिख सिकलीगर बांधवांनी आपल्या मतदानाच्या अधिकारांवर गधा येते की काय ? या प्रश्नाने भयभीत होऊन नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाराचे सन्मानयोग मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंगजी साहीब यांच्यासह गुरुद्वाऱा बोर्डाचे अधिक्षक ठाणसिंघ बुंगई यांना संयुक्त निवेदन देऊन गुरुद्वाऱा ॲक्ट १९५६ च्या कायद्या अनुसार सचखंड गुरुद्वारा बोर्ड तसेच चंद्रपूर येथील निवडणूक प्रक्रियेत संपूर्ण मराठवाड्यातील गुरसिखीशी एकनिष्ठ असलेल्या मतदात्यांचा मतदानाचा हक्क कायम ठेवावा अशी मागणी केली आहे.

तख्त सचखंड गुरुद्वाराचे सन्मानयोग मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंगजी साहीब यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की आगामी काही दिवसात सचखंड गुरुद्वारा बोर्ड तसेच मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. परंतु या निवडणुकीत मराठवाड्यातील समुह साध संगतचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याने मराठवाड्यातील गुरसिखीशी एकनिष्ठ असलेल्या संपूर्ण मतदार बांधवात रोष निर्माण होत आहे आगामी सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील उमेदवार निवडणूक लढविणार आहेत परंतु या पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारा निवडणुकीत मराठवाड्यातील मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावले जाण्याची शक्यता असल्यामुळे नाराजी पसरली असून गुरुद्वाऱा ॲक्ट १९५६ च्या कायद्या नुसार संपूर्ण मराठवाडा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांचा मतदानाचा हक्क कायम ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर ठाकूरसिंघ बावरी,बलजीतसिंघ बावरी,तेगासिंघ बावरी,जहागीरसिंघ बावरी यांच्यासह जवळपास जवळपास ७० जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत सदरील मागणी मान्य न झाल्यास  न्यायालयात जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या