🌟पुर्णेत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची 126 वी जयंती साजरी....!


🌟या वेळी उपासक व उपासीका यांनी मनोगत व्यक्त केली🌟

पुर्णा : पुर्णेत आज भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची 126 वी जयंती पूर्ण शहरात साजरी करण्यात आली सकाळी ठीक 10.00 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण माजी सचिव भारतीय बौद्ध महासभा ढाकरगे एच .आर .माजी तालुकाध्यक्ष एम.यु.खंदारे साहेब श्रावण एंगडे व रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ठीक बारा वाजता बँड पथकाच्या संगीता सह व लेझीम पथकासह माता रमाईची जंयती मिरवणूक निघाली. या मिरवणुकीचा शेवट डॉ.आंबेडकर चौक पूर्णा येथे अभिवादन सभेत झाला या अभिवादन सभेची अध्यक्षा शिवकन्या बाई कांबळे प्रमुख पाहुण्या मंजुषा ताई पाटील , रेखाताई अनिल खर्गखराटे, जनाबाई जोंधळे व मिराबाई बोधक या होत्या. 

 पुर्णा नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक उत्तम भैय्या खंदारे,लक्ष्मीकांत शिंदे,लक्ष्मण गायकवाड, सुनील गायकवाड , राजकुमार सुर्यवंशी,रायभोळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास,माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्प हार घालून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. या वेळी उपासक व उपासीका यांनी मनोगत व्यक्त केली. 

  या कार्यक्रमाचे सुत्र संचालन माजी तालुका कोषअध्यक्ष ढाकरगे के. एच. सर यांनी केले, प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सुनील मगरे यांनी तर आभार तालुका सचिव आनंद वाहीवाळ यांनी मानले शेवटी सरनातय गाथेने कार्यक्रमची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता भारतीय बौद्ध महासभा पुर्णा चे आजी माजी पदाधिकारी व समता सैनिक दल बौद्धाचार्य यांनी परिश्रम घेतले.या वेळी भारतीय बौद्ध महासभा चे सर्व आजी माजी पदाधिकारी, समता सैनिक दल, महिला मंडळ व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या