🌟साखरेचा विक्री दर प्रति किलो 20 रुपये किरकोळ दराने वाटप करण्यात येणार - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
परभणी : जिल्ह्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 या तीन महिन्यासाठी 1 हजार 53 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झाले आहे. परभणी जिल्ह्यासाठी यशस्वी साखर पुरवठादार म्हणून कान्हा पारखे, इंडो अलाइड प्रोटीन फुड्स प्रा. लिमिटेड यांची निवड करण्यात आली आहे.
साखर नियतन क्विंटलमध्ये तालुका व गोदामनिहाय पुढीलप्रमाणे आहे. परभणी -286, पुर्णा - 119, पालम -75, गंगाखेड - 94, सोनपेठ - 51, पाथरी - 88, सेलू - 134, मानवत - 79, जिंतूर - 90, बोरी -37 याप्रमाणे तिमाही साखर नियतन प्राप्त झाले आहे. साखर नियतन फक्त अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिमहा प्रति कुटुंब (प्रतिशिधापत्रिका) एक किलो याप्रमाणे आहे. साखरेचा विक्री दर प्रति किलो 20 रुपये किरकोळ दराने वाटप करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे......
0 टिप्पण्या