🌟परभणीकरांसाठी उद्या शुक्रवार दि.09 फेब्रुवारी रोजी ‘कलासंगम आणि वऱ्हाड निघालय लंडनला’ कार्यक्रमाची मेजवानी....!


🌟या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे 

परभणी (दि.08 फेब्रुवारी) : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त राज्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून परभणी येथील विष्णु जिनींग मिल येथे 7 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलावंतांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत प्रभावी रितीने पोहोचावी, हा या महासंस्कृती कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. परभणी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि. 7 ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाच दिवसीय भव्य अशा महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. 

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचा अनोखा अविष्कार ‘कलासंगम’ या कार्यक्रमातून सादर होणार आहे. यादिवशी, डॉ.लक्ष्मण देशपांडेंच्या ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या अजरामर एकपात्री प्रयोगाला ज्यांनी पुन्हा रसिकांसमोर सक्षम अभिनयातून आणले असे सुविख्यात अभिनेते मराठवाड्याचे भूमिपुत्र संदिप पाठक हे विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहे. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या