🌟पालम तालुका प्रशासनाच्या विनंतीवरून फरकंडा येथील आमरण उपोषण अखेर 09 व्या दिवशी मागे.....!


🌟फरकंडा येथील समाजसेवक सिताराम गुरुजी हे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसले होते🌟 


पालम (दि.20 फेब्रुवारी) - मराठा आरक्षणासाठी आता मनोज जरांगे पाटील यांचा जो लढा चालू आहे या लढ्याच्या समर्थनासाठी पालम तालुक्यातील फरकंडा येथील समाजसेवक सिताराम गुरुजी  यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं उपोषणाचा आज मंगळवार दि.२० फेब्रुवारी रोजी 09 वा दिवस होता आणि त्यांना प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात आली होती की त्यांनी उपोषण माघारी घ्यावं यानिमित्त त्यांनी प्रशासनाचा विनंतीला मान देऊन नारळ पाणी घेऊन  आज त्यांनी उपोषण मागे घेतलं त्यांची तब्येत देखील तीन दिवसापूर्वी खालावली होती तीन दिवसापासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार देखील चालू होते आणि आज त्यांनी उपोषण मागे घेतलं त्यांची जी मागणी होती पालम तालुक्यामधील कुणबी नोंदी बाबतचे आजपर्यंत नमुना 33 नमुना 34 यामध्ये जवळपास आपल्याकडे 11 गावाच्या नोंदी सापडलेले आहेत अशी माहिती पालम तहसीलदार यांनी उपोषण थळी फरकंडा गावकऱ्यांना दिली त्या 11 गावाच्या नोंदी संबंधित गावांमध्ये प्रदर्शित देखील करण्यात आलेले आहेत.


तर जवळपास तालुक्यामध्ये 500 वर  प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आलेले आहेत तर फरकंडा या गावातील गावांमध्ये नमुना 33 34 चा शोध घेण्यात आला परंतु दुर्दैवाने फरकंडा या गावातील नमुना 33 34 मध्ये कुणबी अशा नोंदी सापडलेल्या नाहीत परंतु शेजारच्या पूर्णा तालुक्यामध्ये माहेर या ठिकाणी एक नोंद सापडली होती ती नोंद वंशावळ या ठिकाणी या गावातील सिद्ध झालेले आहे आणि त्या आधारे या गावातीलच एका लाभार्थ्याला जात प्रमाणपत्र देखील देण्यात आलेले आहे याच पद्धतीने वंशावळ सिद्ध करून जास्तीत जास्त जात प्रमाणपत्र देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न चालू आहे यावेळी तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे , तलाठी आमदरे , डॉ पिसाळ ,व  तालुका अध्यक्ष प्रकाशराव कोकाटे, रामराव शिदे  तसेच यावेळी तमाम गावकरी  मंडळी फरकंडा  उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या