🌟नांदेड येथील तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डावर लादलेल्या नवीन कायद्या विरोधातील साखळी उपोषणाचा आज 09 वा दिवस....!


🌟नांदेड जिल्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेत ? जिल्हाधिकारी अभिजित राऊत लक्ष देतील काय ?🌟 


नांदेड (दि.17 फेब्रुवारी) - राज्य शासनाने गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 संमत करून लादला जात असल्याने त्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाची मागील आठ दिवसापासून जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. 

     जागतिक ख्यात कीर्तीचे सचखंड गुरुद्वारा नांदेडच्या व्यवस्थापनासाठी अस्तित्वात असलेला गुरुद्वारा बोर्ड अॅक्ट 1956 बदलून राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 संमत केला आहे या कायद्याला सर्व शीख धर्मीयांचा देशभरातून विरोध होत आहे याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज 09 वा दिवस असून आज शनिवार दि.17 फेब्रुवारी रोजी साखळी उपोषणात कश्मीर सिंग भट्टी,हरभजन सिंग दिगवा,सुरजित सिंग मिरधा ,सदगीर सिंग टाक,फतेसिंग भाटिया,सतनाम सिंग मिरधा,भूपेंद्र सिंग कापसे,विजय सिंग बडगुजर,सुरेंद्र सिंग भट्टी यांनी सहभाग नोंदवला.

तर त्यांना पाठिंबा म्हणून मनप्रीत सिंघ कुंजीवाले,गुरमीतसिंघ बेदी,मनप्रीतसिंघ कारागीर,शेरसिंघ फौजी रविन्दरसिंघ बुंगई,रविन्दरसिंघ पुजारी,गुरमीतसिंघ महाजन,जगदीप सिंघ नम्बरदार,मनबीर सिंघ ग्रंथी,दिपकसिंघ गल्लीवाले,राजेंद्रसिंग पुजारी,दिपकसिंघ हजुरिया,मनिंदरसिंघ राज रामगडीया,जसबीरसिंघ बुंगई,प्रेमजीतसिंघ शिलेदार,करणसिंघ लोनिवाले,सिमरनजीतसिंघ कुंजीवाले,अमरप्रीतसिंघ हंडी,हरभजनसिंघ पुजारी,भोलासिंघ गाड़ीवाले,दिपकसिंघ हजूरिया,बीरेंद्रसिंघ बेदी,जगजीत सिंघ खालसा,महेन्दरसिंघ पैदल,सुरेंद्रसिंघ मेंबर,जसपालसिंघ लांगरी,अवतार सिंघ पहरेदार,कृपाल सिंह हजुरिया धुपिया परविंदरसिंग लोहिया,गोविंद सिंघ पुजारी,हरभजनसिंघ पुजारी,हनीसिंघ बासरीवाले,मन्नूसिंघ लांगरी वीरेंद्रसिंघ रागी बरार,हरजीतसिंघ गिल तसेच हजुरी पाठी संघटना नांदेड़ यानी अनेक पाठी सिंघ सोबत घेऊन सरदार दलजीतसिंघ बिशनसिंघ हजुरी पाठी संघटना अध्यक्ष प्रदीपसिंघ रागी उपाध्यक्ष जगदीप सिंघ नंबरदार सचिव जाहिर पाठिम्बा दर्शविला असताना आज शनिवार नवा दिवसाचा कालावधी लोटला असला तरीही जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेऊन कारवाई करण्याचे टाळले आहे. या साखळी उपोषणाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून यामध्ये जिल्ह्याचे दिग्गज लोकप्रतिनिधी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या