🌟परभणी जिल्हा क्रिडा संकुल ते कृषि विद्यापीठ गेट खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे दि.09 फेब्रुवारी रोजी आयोजन.....!

🌟स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवन्याचे आवाहन आरोग्य सेवा सहा.संचालक डॉ.पंढरीनाथ लक्कमवाड यांनी केले🌟


परभणी (दि.01 फेब्रुवारी) : राज्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत समाजात कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी परभणी शहरात दि. 9 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 7.00 वा. जिल्हा क्रीडा संकुल ते कृषि विद्यापीठ गेट खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे. या मॅरेथॉन स्पर्धेतुन पहिला, दुसरा, तिसरा विजेत्याची निवड करण्यात येईल त्यांना अनुक्रमे रु. 5 हजार,  3 हजार, 2 हजार व उत्तेजनार्थ 6 बक्षिसे प्रत्येकी रु. 1 हजार प्रमाणे बक्षिस व प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात येणार आहे. तरी या मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आरोग्य सेवा सहायक संचालक डॉ. पंढरीनाथ लक्कमवाड यांनी केले आहे.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या